मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध संघटनांकडून निषेध मोर्चे काढण्यात आले. या मोर्चाच्या माध्यमातून राज्यपालांना हटवण्याची मागणी करण्यात आली. मात्र, अद्याप देखील सरकारकडून राज्यपालांच्या या विधानाचा निषेध करण्यात आलेला नाही. आज शिवप्रताप दिन आहे. म्हणजे याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आणि शिवाजी महाराजांचे वंशज समजले जाणारे उदयनराजे भोसले देखील प्रतापगडावर होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात उपस्थित राहणार ( Sanjay Raut Criticize Shivaji Maharaj Descendants ) आहेत. यावर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली ( Sanjay Raut criticism CM )आहे.
सरकार तोंड शिवून बसले आहे : यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "शिवप्रताप दिनाचा उत्सव हा महाराष्ट्रात दरवर्षी होत असतो. शिवप्रताप दिनाच महत्त्व समजून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचा धिक्कार केला असता व राजभवनातून परत जाण्याची मागणी केली असती तर आजच्या शिवप्रताप दिनाचे महत्त्व अजून वाढले असते. शिवाजी महाराजांचा अपमान करणारे राज्यपाल अजून राजभवनात आहेत. सरकार तोंड शिवून गप्प बसलेले आहे."
ही महाराष्ट्राची भावना : पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते हे देखील शिवाजी महाराजांवरती बोलून ते त्या पदावर बसलेले आहेत. तुम्ही त्यांच समर्थन करत आहात. अशा मुख्यमंत्र्यांना गडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा अधिकार आहे का? असा विचार या राज्यातील जनता करत आहे. उदयनराजे यांचे अश्रू पाहिले आहेत. त्यांच्या प्रमाणेच हे महाराष्ट्राचे अश्रू आहेत. त्यांची भावना ही महाराष्ट्राची भावना आहे. शिवरायांचा अपमान सहन करणाऱ्यांना मरण का येत नाही? ही महाराष्ट्राची भावना व्यक्त ( Controversial Statement On Chhatrapati Shivaji Maharaj ) आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार अशा प्रकारचा होत असलेला अपमान हतबलतेने पाहते आणि त्यानंतर शिवप्रताप दिन साजरा करते हे सर्व ढोंग आहे."
कर्नाटकला जाणार नाही : महाराष्ट्र कर्नाटक बेळगाव सीमावाद अद्याप काही थंड झालेला नाही. बेळगाव न्यायालयाकडून संजय राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसीबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "बेळगावच्या समन्ससाठी आम्ही यावेळी वकील पाठवलेले आहेत. त्यानंतर पुढली तारीख असेल त्या पुढल्या तारखेला मी उपस्थित असेल. कर्नाटक सीमा वादावर सुनावणी झाले तर होईल. आम्ही सगळेच वाट पाहत आहोत. कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीला ठाण मांडून बसलेले आहेत. आमचे मुख्यमंत्री कुठे आहेत? हा मोठा प्रश्न आहे."