पुणे : सध्या सर्वत्र दिवाळी (Diwali) मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी विविध कलाकारांच्या माध्यमातून रांगोळ्या काढल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. तसंच महिलांच्याबाबत त्यांनी घेतलेल्या निर्णयाची कृतज्ञता म्हणून पुण्यात श्रीरंग कलादर्पणच्यावतीनं, 150 किलो कडधान्यांचा वापर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रांगोळी साकारण्यात आली आहे.
कडधान्यातून साकारली रांगोळी : श्रीरंग कलादर्पणच्यावतीनं दिवाळीत विविध सामाजिक विषय घेऊन रांगोळी काढली जाते. यंदाच्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कडधान्याच्या माध्यमातून रांगोळी काढण्यात आली आहे.
10 ते 15 फुटाची रांगोळी : यावेळी गायत्री शहापुरकर म्हणाल्या की, "दिवाळी म्हटलं की रांगोळी ही आलीच. यंदाच्या दिवाळीत कोणती रांगोळी साकारायची हा विचार आम्हाला आला होता. तेव्हा सर्वांनी एकमतानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं. कारण त्यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक योजना या सर्वसाधारण नागरिकांसाठी आणल्या आहेत. तसंच नुकतीच गाजलेली योजना म्हणजे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रू महिना मिळत आहेत. यामुळं आम्ही यंदाच्या दिवाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रांगोळी काढली आहे". ही रांगोळी काढण्यासाठी 150 किलो डाळी तसंच कडधान्याचा वापर केला आहे.
28 तासाचा लागला वेळ : ही रांगोळी काढण्यासाठी 10 ते 12 महिलांनी काम केलंय. यासाठी जवळपास 28 तासाचा वेळ लागला आहे. आता ही रांगोळी पाच दिवसासाठी सर्व सामान्य नागरिकांसाठी बघण्यासाठी खुली असणार आहे. यानंतर रांगोळीत वापरण्यात आलेलं कडधान्य हे गोशाळेला दान करण्यात येणार आहेत.
हेही वाचा -