मुंबई: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 102 दिवस अर्थ रोड कारागृहात असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत Shiv Sena MP Sanjay Raut यांची आज 2 लाखांच्या जात मुचलक्यावर विशेष पीएम कोर्टाने सुटका केली आहे. त्यानंतर आज पावणे सातच्या सुमारास सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून संजय राऊत यांची आर्थर रोड कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी असंख्य शिवसैनिकांनी कारागृहाबाहेर तोबा गर्दी केली होती. जमलेल्या या आपल्या चाहत्यांना आणि शिवसैनिकांना संजय राऊत यांनी कारचा सन रूफमधून बाहेर येऊन अभिवादन केले आहे. तसेच ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की सर्वप्रथम मी बाळासाहेब ठाकरे यांचं दर्शन घेणार असून ही जमलेली तोबा गर्दी म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना आहे असही ते म्हणाले.
खंत व्यक्त केली - तुरुंगातले हे दिवस आपण कधीही विसरणार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. आपण चाळीस वर्ष पत्रकारिता करत आहोत. यासोबतच 30 वर्ष सामना सारख्या मोठ्या वृत्तपत्राचे आपण संपादक राहिला आहोत. 4 वेळा खासदार म्हणून राज्यसभेवर गेले आहोत. अशा व्यक्तीला अटक केली जाते. केंद्रीय तपास यंत्रणेकडून आपल्याला अटक करण्यात आली. मात्र आपण कायदेशीर लढाई जिंकलो असल्याचा पत्रकाराची संवाद साधताना संजय राऊत म्हणाले आहेत.
सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन आर्थर रोड जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत हे पहिले सिद्धीविनायक मंदिरात जाणार आहेत. यानंतर ते शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करणार आहेत. शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी जाणार आहेत.
जोरदार स्वागत आणि शक्तिप्रदर्शन अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. 102 दिवसानंतर संजय राऊत हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संजय राऊत यांचं जोरदार स्वागत आणि शक्तिप्रदर्शन आर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर केलं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर लगेचच संजय राऊत यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं त्यानंतर संजय राऊत यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावर जाऊन देखील दर्शन घेतलं. सिद्धिविनायक मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमाची संवाद साधताना संजय राऊत यांनी जामीन मंजूर केल्याबद्दल न्यायालयाचे आभार मानले आहेत.