मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. पूजाने आत्महत्या केली त्यादिवशी वनमंत्री संजय राठोड हिचे तिला 45 कॉल आले, असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला. तसेच सगळ्या आरोपांवर पुणे शहर पोलीसदेखील संजय राठोड यांना पाठीशी घालत असल्याचे त्या म्हणाल्या.
पूजाचा मृत्यू झाला, त्या घटनास्थळाची काल (गुरुवारी) चित्रा वाघ यांनी पाहणी केली. यानंतर त्या वनमंत्री संजय राठोड यांच्यावर जोरदार बरसल्या. पुणे पोलीस आयुक्त संजय राठोड यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच संजय राठोडसारखी घाण मंत्रिमंडळात नको, या शब्दात भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांची मुख्यमंत्र्यांना विनवणी केली. यानंतर त्यांनी आज नवीन खुलासा केला आहे.
हेही वाचा - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पहिला तक्रार अर्ज दाखल
पूजाच्या मोबाईलवर 45 कॉल?
पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या दिवशी तिच्या मोबाईलवर 45 कॉल हे संजय राठोड यांचे आले आहे, अशी धक्कादायक माहिती चित्रा वाघ यांनी आज दिली. तसेच या सगळ्या आरोपांवर पुणे शहर पोलीसदेखील संजय राठोड यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पैशांच्या जोरावर अशा पद्धतीने पोरी-बाळांना दाबण्याचे काम राज्यातील मंत्री करत असतील किंवा महाराष्ट्रात होत असतील, असा चुकीचा पायंडा मुख्यमंत्री महोदय यांनी पाडू नये, अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनवणी आहे, असेही त्या म्हणाल्या.