मुंबई - काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक यादरम्यान झाली तर काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात विभाजन होईल, अशी भीती काँग्रेसचे माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी व्यक्त केली आहे. देशातील आजच्या एकूणच राजकीय परिस्थितीमध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घेणे हे घातक ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यादरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झालीच तर त्यासाठी राहुल गांधी हेच नाव समोर येईल आणि तेच जिंकतील, असा विश्वास त्यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त आहे.
-
कॉंग्रेस में जिस संगठनात्मक चुनाव की बात कुछ नेतागण कर रहे हैं
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) August 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
देश के कितने राजनीतिक दलों में ‘वैसे’ चुनाव हुए हैं ?
आज के दौर में कॉंग्रेस अध्यक्ष का चुनाव कराना घातक है।
वैसे,चुनाव हुए तो लोकप्रियता के कारण राहुल गांधी ही जीतेंगे,तय है।
लेकिन पार्टी में बड़ा विभाजन हो जाएगा।
">कॉंग्रेस में जिस संगठनात्मक चुनाव की बात कुछ नेतागण कर रहे हैं
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) August 28, 2020
देश के कितने राजनीतिक दलों में ‘वैसे’ चुनाव हुए हैं ?
आज के दौर में कॉंग्रेस अध्यक्ष का चुनाव कराना घातक है।
वैसे,चुनाव हुए तो लोकप्रियता के कारण राहुल गांधी ही जीतेंगे,तय है।
लेकिन पार्टी में बड़ा विभाजन हो जाएगा।कॉंग्रेस में जिस संगठनात्मक चुनाव की बात कुछ नेतागण कर रहे हैं
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) August 28, 2020
देश के कितने राजनीतिक दलों में ‘वैसे’ चुनाव हुए हैं ?
आज के दौर में कॉंग्रेस अध्यक्ष का चुनाव कराना घातक है।
वैसे,चुनाव हुए तो लोकप्रियता के कारण राहुल गांधी ही जीतेंगे,तय है।
लेकिन पार्टी में बड़ा विभाजन हो जाएगा।
काँग्रेसच्या पक्ष नेतृत्व संदर्भात मागील काही दिवसांत देशातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून याविषयी निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यावरून देशभरात काँग्रेस नेत्यांमध्ये एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. दिल्ली येथे काँग्रेसच्या झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या पदावर तुर्तास राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर पडदा पडला होता. मात्र पुन्हा त्यावर चर्चा सुरू झाल्याने निरुपम यांनीही ट्विट करून आपले मत व्यक्त केले आहे.
यासोबतच काँग्रेससोबत इतर पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून अद्यापही काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू असल्याने याविषयी निरुपम यांनी ट्विट करून या नेत्यांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या संदर्भात जे नेते संघटनेच्या एकूणच निवडणुकीसंदर्भात चर्चा करत आहेत, त्यांनाही निरुपम यांनी देशातील कोणत्या राजकीय पक्षांमध्ये अशा प्रकारच्या निवडणुका झाल्या आहेत? सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.