ETV Bharat / state

'जेएनयू'मध्ये झालेला हल्ला हा सरकार पुरस्कृत - सम्यक विद्यार्थी संघटना - jnu attack news

'जेएनयू'सारखी विद्यापीठे अदानी आणि अंबानी यांच्या घशात घालण्यासाठी देशभरातील विद्यापीठांमध्ये सरकार पुरस्कृत हल्ले सुरू असल्याचा गंभीर आरोप सम्यक विद्यार्थी संघटनेचे महेश भारतीय यांनी केला आहे. 'गेट वे ऑफ इंडिया' जवळ सुरू असलेल्या जेएनयु हल्ल्याविरोधातील आंदोलनादरम्यान ते बोलत होते.

samyak-students-organisation-react-on-jnu-matter
विद्यापीठे अदानी अंबानी यांच्या घशात घालण्यासाठी सरकार पुरस्कृत हल्ले; सम्यक विद्यार्थी संघटना
author img

By

Published : Jan 7, 2020, 3:05 AM IST

मुंबई - नेहरूंच्या काळात 7 टक्के असलेला शिक्षणावरील निधी केंद्र सरकारने कमी करत 3 टक्क्यांवर आणला आहे. याला वाचा फुटू नये म्हणून, तसेच ही विद्यापीठे अदानी आणि अंबानी यांच्या घशात घालण्यासाठी देशभरातील विद्यापीठांमध्ये सरकार पुरस्कृत हल्ले सुरू असल्याचा गंभीर आरोप सम्यक विद्यार्थी संघटनेचे महेश भारतीय यांनी केला आहे. 'गेट वे ऑफ इंडिया' जवळ सुरू असलेल्या जेएनयु हल्ल्याविरोधातील आंदोलनादरम्यान ते बोलत होते.

जेएनयुमध्ये झालेला हल्ला हा सरकार पुरस्कृत ; सम्यक विद्यार्थी संघटना

हेही वाचा - BREAKING NEWS : हिंदू रक्षा दलाने स्वीकारली जेएनयू हल्ल्याची जबाबदारी; पुन्हा हल्ला करण्याची दिली धमकी

सरकारने शिक्षणाच्या अर्थसंकल्यामधील 3,500 कोटी रुपये 'एनआरसी'साठी वापरले आहेत. त्यासाठी शासकीय विद्यापीठे बंद करून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याचे कारस्थान सुरू आहे. ही विद्यापीठे ताब्यात घेऊन अदानी आणि अंबानी यांना देण्याचा सरकारचा घाट आहे. असा आरोप भारतीय यांनी यावेळी केला. देशातील सर्वच विद्यापीठांमध्ये असे हल्ले सुरू आहेत. जवाहरलाल नेहरू यांचे मंत्रिमंडळ पहिल्यांदा आले तेव्हा शिक्षणासाठी 7 टक्के निधीची तरतूद करण्यात आली होती. आता मोदी सरकारच्या काळात हा निधी 3 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे आता सरकार पळवाटा काढण्यासाठी विद्यार्थ्यांवर हल्ले करून त्यांना गावाला परत पाठवण्याचे कारस्थान करत आहे, असेही ते म्हणाले.

दरम्याान, जेएनयुमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू असून मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथेही विविध विद्यार्थी संघटना एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला जितेंद्र आव्हाड, रोहीत पवार, संजय निरुपम यांनी भेट दिली. गेल्या 24 तासांपासून अधिक काळ हे आंदोलन सुरूच आहे. न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

Intro:मुंबई - केंद्र सरकारने शिक्षणावरील निधीची तरतूद कमी केली आहे. नेहरूंच्या काळात 7 टक्के असलेले शिक्षणावरील बजेट 3 टक्क्यांवर आले आहे. याला वाचा फुटू नये म्हणून तसेच ही विद्यापीठे अडाणी आणि अंबानी यांच्या घशात घालण्यासाठी सरकार पुरस्कृत हल्ले देशभरातील विद्यापीठात सुरू असल्याचा गंभीर आरोप सम्यक विद्यार्थी संघटनेचे महेश भारतीय यांनी केला आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळ सुरू असलेल्या जेएनयु हल्ल्याविरोधातील आंदोलनदरम्यान त्यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना हा आरोप केला.Body:यावेळी बोलताना सरकारने शिक्षणाच्या बजेटमधील 3500 कोटी काढून एनआरसीसाठी वापरले आहेत. त्यासाठी पब्लिक सेक्टरमधील विद्यापीठे बंद करून विद्यार्थ्याना घरी पाठवण्याचे कारस्थान सुरू आहे. ही विद्यापीठे ताब्यात घेऊन अडाणी आणि अंबानी यांच्या ताब्यात देण्याचा घाट आहे. जेएनयु मध्ये झालेला हल्ला हा सरकार पुरस्कृत द्यायचे कारस्थान सुरू आहे. देशातील सर्वच विद्यापीठात असे हल्ले सुरू आहेत. जवाहरलाल नेहरू यांचे मंत्रिमंडळ पहिल्यांदा आले तेव्हा शिक्षणासाठी 7 टक्के निधीची तरतूद करण्यात आली होती. आता मोदी सरकारच्या काळात हा निधी 3 टक्क्यांवर आला आहे. यासाठी सरकार पळवाटा काढण्यासाठी विद्यार्थ्यांवर हल्ले करून त्यांना गावाला पाठवण्याचे कारस्थान करत आहे. याविरोधात सम्यक विद्यार्थी संघटनेचे आंदोलन महाराष्ट्रभर सुरू राहणार असल्याचे भारतीय यांनी सांगितले.

दिल्ली येथील जेएनयु विष विद्यालयातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथेही विविध विद्यार्थी संघटना एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला जितेंद्र आव्हाड, रोहीत पवार, संजय निरुपम यांनी भेट दिली आहे. आज या आंदोलनाला 24 तास झाले तरीही हे आंदोलन सुरूच आहे.न्याय मिळे पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

सम्यक विद्यार्थी संघटनेचे महेश भारतीय यांची बाईट
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.