मुंबई - सुशांतसिंह प्रकरणात रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा या दोघांना एनसीबीने अटक केली आहे. त्यांना आज मुंबईत न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे.
- सुशांतसिंह राजपूत प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक करण्यात आलेला आरोपी कैजाण इब्राहिम यास 10 हजारांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. कैजाण यास न्यायालयात हजर केले असता त्यास कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपीच्या वकिलांकडून जामीन याचिका करण्यात आली असता त्यास न्यायालयाने 10 हजारांचा जामीन मंजूर करण्यात आला.
- दोन आरोपींना एनसीबीने रिमांडमध्ये घेतले आहे. त्यात शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा हे दोघे आहेत. रियाला समन्स पाठवण्याबाबत योग्य वेळेस सांगण्यात येईल. आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येईल. त्यात अजून माहिती या प्रकरणात समोर येऊ शकते. जसा जसा तपास पुढे जाईल अजून लिंक्स हाती लागू शकतात, अशी माहिती एनसीबी अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली.
- सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आहे. यापूर्वी शोविकने एनसीबीसमोर कबूल केले होते की, तो बहिण रियासाठी ड्रग्स खरेदी करत होता. त्याचवेळी सॅम्युअल मिरांडाने कबूल केले होते की, तो सुशांतसाठी औषधे खरेदी करत होता. याच त्यांच्या जबाबावरून एनसीबीने दोघांना अटक केली आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अटक करण्यात आलेले शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यांना पुढील चौकशीसाठी ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे.