मुंबई : कर्डिलेया क्रूझ ड्रग प्रकरणात एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्याच दरम्यान समीर वानखेडे यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी मुंबई इच्च न्यायालयात धाव घेतली होती. समीर वानखेडेच्या याचिका सुनावणी करताना क्रूझ ड्रग प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर न्यायालयाने समीर वानखेडे यांना 24 मे पर्यंत दिलासा दिला आहे. समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. समीर वानखेडे यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार वानखेडे यांना 24 मे पर्यंत अटक करता येणार नाही. पण सीबीआयच्या तपासात सहकार्य करा असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाने काय दिला निर्णय : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात वानखेडेंनी शाहरूख खानकडून खंडणी मागितल्याचा आरोपी सीबीआयने केला आहे. सीबीआयने याप्रकरणी गुन्हा सीबीआयनं दाखल केला असून वानखेडेंची चौकशी होणार आहे. सीबीआयच्या आरोपांविरुद्धात समीर वानखेडेंनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावर आज दुपारी सुनावणी झाली. वानखेडेंच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. समीर वानखेडे यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार वानखेडे यांना 22 मे पर्यंत अटक करता येणार नाही. पण सीबीआयच्या तपासात सहकार्य करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या खंडपीठाने दिला निर्णय : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. या याचिकेसोबत संभाषणाची प्रत जोडण्यात आली होती. सुट्टीकालीन कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती अरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठाने तातडीची सुनावणी करत हा निर्णय दिला. रिझवान मर्चंट,आबाद पोंडा या वकिलांनी उच्च न्यायालयात वानखेडेंची बाजू मांडली.
सीबीआयला वानखेडेंविषयी शंका : न्यायालयाने दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेऊन समीर वानखेडे यांनी चौकशी आणि तपासणी कामी नियमित सीबीआयला सहकार्य केले पाहिजे म्हटले. म्हणजे पुढचा प्रश्न उद्भवणार नाही' असे आपल्या निर्देशात नमूद केले. तसेच जर तुम्ही सहकार्य करीत आहात तर मग सीबीआय कोणत्याही रीतीने अटक करणार नाही किंवा जोर जबरदस्ती करणार नाही. मात्र सीबीआयच्या वकिलांनी सांगितले की "समीर वानखेडे ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या वेळेत चौकशी करायला तयार होतात. मात्र सीबीआय ज्या तारखेला सांगते त्या तारखेला ते चौकशीला हजर राहत नाही त्यामुळेच आम्हाला त्यांच्या बाबत शंका निर्माण होते.
वानखेडेंच्या वकिलांचे मराठी उत्तर : आर्यन खान ड्रग प्रकरण खूप प्रकाशझोतात आले आहे. आज समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयातील वातावरण खूप तणावपूर्ण होते. न्यायालयाने वानखेडे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर सीबीआयच्या वकिलांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. समीर वानखेडेंना चौकशीसाठी जेव्हा बोलवले जाते हे त्या दिवशी हजर राहत नाहीत. त्यामुळे त्यांच्या विषयी शंका येते. त्यावर समीर वानखेडे यांची वकील रिझवान मर्चंट यांनी सांगितले अहो, हो बाबा आम्ही चौकशी तयार आहोत. आमचा कुठलाही त्यासाठी नकार नाही. असा स्पष्ट मराठीमध्ये संवाद केल्यामुळे न्यायालयामधील गरम वातावरण काहीसे निवळले आणि हलकफुलकं झाले.
वानखेडेंच्या वकीलांचा युक्तीवाद : उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती शर्मिला देशमुख आणि न्यायमूर्ती आसिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर बाजू मांडत असताना सीबीआयच्या वकिलांनी जोरदारपणे युक्तिवाद केला. भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायदा 1988 मधील कलम 17 अ नुसार शासनाने एफआयआर दाखल करण्यासाठी अनुमती घेऊन त्याला परवानगी मिळाली आहे. त्यानंतर एफआयआर दाखल केला आणि या प्रक्रियेला वेळ लागल्याचे वकिलांनी म्हटले. समीर वानखेडेवर जो आरोप करण्यात आला आहे, तो खोटा आहे. ज्या उक्त कायद्यानुसार यांनी एफआयआर दाखल केला. त्याबाबत जो निर्णय घेतला त्याला चार महिन्याचा उशीर यांनी म्हणजेच सीबीआयने केलेला आहे. कायद्यानुसार चार महिन्याच्या आत विभागीय चौकशी पूर्ण करायला हवी होती. परंतु ते तसे केले नाही म्हणूनच त्यांच्या एकूण कारवाईबाबत आम्हाला शंका उपस्थित होते. यामुळे आम्ही न्यायालयकडे संरक्षण मागण्यासाठी आलो, असल्याचा युक्तीवाद वकिलांनी केला.
काय म्हणाले वकील : समीर वानखेडे यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी ईटीव्हीला प्रतिक्रिया देताना म्हणाले आहे की,
ज्या पद्धतीने सोशल मीडियावर जो आरोप केलेला आहे, तो तो तदन खोटा आहे, हे केवळ बदनामी आहे. शाहरुख खान यांचा जो ई-मेल उघडकीस झालेला आहे. त्यामध्ये त्यांनी समीर वानखेडे यांच्यावर कोणत्याही रीतीने कुठल्याही प्रकारचे आरोप केलेले नाहीत. उलट एका बापाने आपल्या लेकराविषयी सहृदयता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे त्याच्यातून कुठलाही आरोप वानखेडेवर निघत नाही. परंतु एनसीबीच्या काही अधिकाऱयांनी कायद्याचा दुरुपयोग करत समीर वानखेडे यांच्यावर खोट्या पद्धतीचा आरोप ठेवलेला आहे. - वकील रिझवान मर्चंट
प्रकरणाची पार्श्वभूमी : समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडे आर्यन खानला अटक न करण्याच्या बदल्यात पंचवीस कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा आरोप सीबीआयने केला आहे. या खंडणीतील 50 लाख रुपये टोकन रक्कम म्हणून देण्यात आल्याचा आरोप देखील सीबीआयने केला आहे. ही रक्कम एनसीबीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये साक्षीदार असलेला किरण गोसावी याने घेतली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांची चौकशी सीबीआयने सुरू केली .आणि त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात समीर वानखेडेने धाव घेतली होती.
न्यायालयावर माझा विश्वास आहे आणि खोट्या आरोपातून मी सही सलामत सुटेल." -समीर वानखेडे
हेही वाचा -