मुंबई - अमली पदार्थ तस्करी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता समीर खान याला 18 जानेवारीपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.
नवाब मलिक यांची प्रतिक्रिया
करण सजनानी व समीर खान यांच्यामध्ये झालेल्या व्हाट्सअप चॅटमध्ये अमली पदार्थांच्या तस्करी बाबत चर्चा करण्यात आली होती. याबरोबरच समीर खान याच्या बँक अकाउंट मधून करण सजनानी या ब्रिटिश अनिवासी भारतीयाच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते. मात्र ट्रान्सफर करण्यात आलेले पैसे किती होते याचा खुलासा एनसीबीने केला नाही. समीर खानला अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे की कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायद्याने त्याचे काम करावे व सत्य लवकरच समोर येईल, असे म्हणत नवाब मलिक यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
समीर खानला 18 जानेवारी पर्यंत एनसीबी कोठडी मुच्छड पानवाला ही आहे सामिलदरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईतील बांद्रा खार परिसरामध्ये छापेमारी करून ब्रिटिश अनिवासी भारतीय असलेल्या अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या करण सजनानी याला एनसीबीने अटक केली होती. या बरोबरच अभिनेत्री दिया मिर्झाची माजी मॅनेजर राहिला फर्निचरवाला सह आणखी एका महिलेला अटक करण्यात आली होती. या आरोपींच्या चौकशीत मुंबईतल्या केम्स कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानवाला उर्फ राम कुमार तिवारी या आरोपीला या प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर त्याला न्यायालयाने 15 हजारांचा जामीन मंजूर केलेला आहे. दरम्यान करण सजनानी हा राम कुमार तिवारी याच्याकडे काही दिवसांच्या अंतराने जाऊन एक पाकीट देत होता. राम कुमार तिवारी यांची बॉलीवुड इंडस्ट्रीतल्या सेलिब्रेटिंशी मोठी ओळख होती. त्यामुळे करण सजनानीकडे असलेले अमली पदार्थ सहजासहजी बॉलीवूडमधील सेलिब्रिटींना विकता यावे म्हणून रामकुमार तिवारीच्या मदतीने करण सजनानी अमली पदार्थाची तस्करी करत असल्याचे समोर आले आहे.हेही वाचा - "धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर, पक्ष म्हणून लवकर निर्णय घेणार"