ETV Bharat / state

Sameer Bhujbal On Ramesh Kadam : रमेश कदम यांचा छगन भुजबळांवरील आरोप म्हणजे स्टंटबाजी - समीर भुजबळ - समीर भुजबळांचा रमेश कदमांवर निशाना

Sameer Bhujbal On Ramesh Kadam : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर माजी आमदार रमेश कदम यांनी केलेले आरोप (Ramesh Kadam allegation against Chhagan Bhujbal) म्हणजे केवळ स्टंटबाजी आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही, असा दावा मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष समीर भुजबळ यांनी केला आहे. (MLA Ramesh Kadam) तर आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या कारखान्यावरील कारवाई कारणाशिवाय झाली नसावी, (notice to Rohit Pawar factory) असेही भुजबळ म्हणाले आहेत. ओबीसी आरक्षण प्रश्नावर राजकीय पक्षांनी इगो बाजूला ठेवून एकत्र यावे, असं आवाहनही त्यांनी (Sameer Bhujbal) यावेळी केलं.

Sameer Bhujbal On Ramesh Kadam
समीर भुजबळ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 3:52 PM IST

समीर भुजबळ रमेश कदम आणि रोहित पवार यांच्याविषयी मत मांडताना

मुंबई Sameer Bhujbal On Ramesh Kadam : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. छगन भुजबळ यांनी तुरुंगातून शरद पवार यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप कदम यांनी केला आहे; मात्र कदम यांचा हा आरोप म्हणजे केवळ स्टंटबाजी असून यात कुठलेही तथ्य नाही. स्वतः आठ वर्षे जेलमध्ये असलेल्या व्यक्तीने बाहेर येऊन केवळ प्रसिद्धीसाठी केलेली ही वक्तव्ये आहेत. तुरुंगात राहून काय ब्लॅकमेल करणार, असा सवाल करत आम्ही केवळ छगन भुजबळांना लवकरात लवकर जामीन मिळावा किंवा भुजबळ यांच्या आजारपणासाठी योग्य औषधोपचार मिळावा यासाठी प्रयत्न करीत होतो, असे स्पष्टीकरण छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी दिले आहे.

कारणाशिवाय कारवाई नाही : आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लिमिटेड या कारखान्यावर कारवाई करण्याबाबत प्रदूषण मंडळानं नोटीस बजावली आहे. या संदर्भात विचारले असता समीर भुजबळ म्हणाले की, कोणतीही कारवाई ही कारणाशिवाय होत नसते. त्यामुळे काहीतरी कारण निश्चितच असावे. म्हणूनच कारवाईची नोटीस देण्यात आली आहे, असे सांगून भुजबळ यांनी प्रदूषण मंडळाने केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे.

मराठी माणूस टिकावा हीच आमची भूमिका : मुंबईत तृप्ती देवरुखकर या महिलेला घर नाकारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर विचारले असता भुजबळ म्हणाले की, ही अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. या शहरात राहण्याचा आणि जगण्याचा सर्वांना अधिकार आहे. अशा पद्धतीने भेदाभेद करून एखाद्याला घर नाकारण्यात येत असेल तर ते अयोग्य आहे. यासंदर्भात कुणालाही घर नाकारले जाऊ नये आणि मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे, जगला पाहिजे अशीच आमच्या पक्षाची भूमिका आहे. आगामी काळात या संदर्भात आम्ही अधिक स्पष्टपणे कार्यवाही करू असं समीर भुजबळ यांनी सांगितलं.

ओबीसी आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे : ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यांना बोलावण्यात आलं नाही. यासंदर्भात विचारलं असता भुजबळ म्हणाले की, ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. कोणाला बोलावले आहे की नाही हे पाहात बसण्यापेक्षा सर्व पक्षांनी एकत्र येऊन ओबीसी समाजाला कसे आरक्षण दिले जाईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मराठा आरक्षणाप्रमाणेच ओबीसी आरक्षण हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, असेही यावेळी समीर भुजबळ म्हणाले.

हेही वाचा:

  1. Raj Thackeray : मराठी महिलेला घर नाकारल्यानंतर राज ठाकरे आक्रमक; म्हणाले, गालावर वळ उठतील
  2. Pankaja Munde : धक्कादायक! पंकजा मुंडेंनाही मराठी असल्यानं मुंबईत घर नाकारलं, इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
  3. Sharad Pawar in Baramati : रोहित पवारांना आलेल्या नोटीसवर शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर; वाचा काय म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.