मुंबई : महाराष्ट्र राज्याची अंदाजे लोकसंख्या १२ कोटी ४९ लाख इतकी आहे. राज्यात ५१२ शासकीय रुग्णालये आहेत. यामध्ये खाटांची संख्या २७ हजार ३३७ इतकी आहे. राज्याची सरासरी लक्षात घेता २ लाख ३४ हजार ६०१ लोकसंख्येमागे एक रूग्णालय किंवा ४२६४ लोकांमागे एक खाट उपलब्ध आहेत. जागतिक आरोग्य सेवेच्या निकषानुसार ४० लोकसंख्येमागे एक रुग्ण खाट असणे आवश्यक आहे. राज्यात मात्र ४२६४ लोकांमध्ये एक रुग्ण खाट उपलब्ध आहे. महासत्ता व मेक इन महाराष्ट्र बनवित असताना आरोग्यसेवेबाबत मात्र आपण आफ्रिकन देशाशी स्पर्धा करीत आहोत, हे वास्तव आहे. राज्यातील जिल्हानिहाय रुग्ण खाटांची अवस्था पाहिल्यास आपल्या आरोग्य सेवेचा दर्जा लक्षात येतो. याचा अर्थ आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास काय अवस्था होईल? याचा शासनाने विचार करणे गरजेचे आहे, असे अहवालात म्हटले आहे.
इतकी रुग्णालय, खाटा वाढल्या : वर्ष २०२१-२२ मध्ये एकूण रुग्णालयांची संख्या ५०३ होती, तर खाटांची संख्या होती २६ हजार ८२३ इतकी होती, तर वर्ष २०२२-२३ मध्ये रुग्णालयांची संख्या ५१२ इतकी झाली तर खाटांची संख्या ५१४ ने वाढून २७ हजार ३३७ इतकी झाली आहे. वर्ष २०११-१२ मध्ये जिल्हा रुग्णालयांची सख्या २३ इतकी होती ती वर्ष २०२२-२३ मध्ये १ ने कमी होऊन २२ इतकी झाली आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये १३ रुग्णालयात छाटांची संख्या ६ हजार १६९ इतकी होती. ती वर्ष २०२२-२३ मध्ये १ हजार ३६ ने कभी होऊन ५ हजार १३३ इतकी झाली आहे.
सरकारने लक्ष देण्याची गरज : जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार ४० लोकांच्या मागे एक खाट असणे गरजेचे आहे. राज्यात मात्र ४ हजार लोकांच्या मागे एक खाट आहे. १३ जिल्ह्यात जिल्हा रुग्णालये नाहीत, तर १६ जिल्ह्यात महिलांसाठी वेगळी रुग्णालय नाहीत. यावरून नागरिकांना कोणत्या प्रकारची आरोग्य सुविधा दिली जात आहे, हे दिसून येते. यामुळे रुग्णांना दोन ते तीन दिवस रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नाहीत. उपचार करण्यासाठी ओपीडीमध्ये लांबच लांब रांग लागलेली असती. सोनोग्राफी, सिटी स्कॅन सारख्या चाचण्या करण्यासाठी दोन महिन्याच्या तारखा दिल्या जातात. ही परिस्थिती राज्य सरकारने बदलणे गरजेचे आहे, असे समर्थन अर्थसंकल्प अध्ययन केंद्रचे विश्लेषक रुपेश किर यांनी आवाहन केले आहे.
कोविडसाठी सज्ज : राज्याच्या आरोग्य विभागाने कोविड परिस्थितीचा सामना करण्यासाठी १५८९ रुग्णालयांमध्ये ५१३८० आयसोलेशन खाटा सज्ज ठेवल्या आहेत. तसेच ४९८८९ ऑक्सीजन बेड, १४४०६ आयसीयू बेड, ९२३५ व्हेंटीलेटर्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. ऑक्सिजनची कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी, याप्रमाणे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
हेही वाचा : Corona In India : कोरोनाचा कहर सुरूच, भारतात 11 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद