ETV Bharat / state

काँग्रेस जुन्यांच्याचं कोंडाळ्यात! नव्या नेतृत्त्वाला संधी द्यावी - शिवसेना

काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल (बुधवार) भाजपमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेश काँग्रेसचे सिंधिया हे बडे नेते मानले जात होते. या त्यांच्या प्रवेशाच्या मुद्यावरून शिनसेनेने मुखपत्र सामनातून काँग्रेसला सल्ला दिला आहे. काँग्रेस जुन्यांच्या कोंडाळ्यात अडकली आहे. त्यामुळे नव्यांची घुसमट होत आहे. त्यामुळे काँग्रेसने नव्या नेतृत्वाला संधी देणे गरजेचे असल्याचे सेनेने म्हटले आहे.

samana editorial comment on congress
काँग्रेस जुन्यांच्याचं कोंडाळ्यात!
author img

By

Published : Mar 12, 2020, 10:05 AM IST

मुंबई - जुने-जाणते नेते अपयशी ठरत असताना नव्या नेतृत्वाला संधी देणे गरजेचे असते. मात्र, काँग्रेस जुन्यांच्या कोंडाळ्यात अडकली आहे. त्यामुळे नव्यांची घुसमट होत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेने मुखपत्र सामनातून दिली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपने संपूर्ण ताकदीने पराभूत केले, आज त्याच भाजपने वाजत गाजत त्यांचे स्वागत केले. मध्य प्रदेशातील ही 'उलटी वरात' भाजपला बुटकुळ्या फुगवणारी वाटत असली तरी कमलनाथ हेसुद्धा कसलेले राजकाराणी असल्याचे सेनेने म्हटले आहे. तसेचे तेथे घडलेल्या घडामोडींवरून राज्यातील कमळपंथीयांनी स्वप्न पाहू नयेत, असा टोलाही सेनेने भाजपला लगावला.

...तर अशी वेळ आली नसती

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांना अडगळीत टाकणे, हे काँग्रेसला महागात पडले आहे. या असंतोषाच्या ठिणग्या गेल्या दिवसांपासून पडत होत्या. त्याची दखल काँग्रेस नेतृत्वाने घेतली नाही. काठावर असलेले बहुमत आपण रेठून नेऊ, या भ्रमात कांग्रेस राहिल्याचे सेनेने म्हटले आहे. सिंधिया हे प्रदेशचे अध्यक्षपद मागत होते, त्यानंतर राज्यसभेची उमेदवारी मागितली अशी चर्चा आहे, यापैकी एखादी त्यांची मागणी पूर्ण केली असती तर तेलही गेलदेखील गेलं अशी अवस्था काँग्रेसवर आली नसती असे सेनेने म्हटले आहे.

राहुल, प्रियांका यांनी नवतरुणांना समजावून घ्यावं

सोनिया गांधी या जुन्या नेत्यांचे नेतृत्व करत असतीलही मात्र, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी नवतरुणांना समजावून घेतले पाहिजे, असे सेनेने म्हटले आहे. तर तेथे घडणाऱ्या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील कमळपंथीयांनी स्वप्ने पाहू नयेत, असा टोला भाजपला लगावला.

महाविकास आघाडीचे सरकार अभेद्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार अभेद्य असल्याचे सेनेने म्हटले आहे. एखाद्या फितूर मुंगीलाही आत बाहेर करता येईल इतकीही फट त्यात नाही. तेव्हा स्वप्ने बघणे सोडाच, असा सलल्ला सेनेने भाजपला दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.