ETV Bharat / state

Salary Increase Of Asha Worker : राज्यातील आशा सेविकांची दिवाळी गोड, भरघोस मानधन वाढीसह दिवाळीची विशेष भेट - Asha Worker

Salary Increase Of Asha Worker : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या ८० हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविकांना (Asha Worker) ७ हजार रुपये तर 3,664 गट प्रवर्तकांना (Increase in remuneration of Group Promoters) प्रत्येकी 6,200 रुपयांची घसघशीत मानधन वाढ केली असल्याची घोषणा आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (Health Minister Dr Tanaji Sawant) यांनी केली आहे. तसंच त्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांची दिवाळी भेट देण्याची घोषणाही सावंत यांनी आज मुंबईत केली.

Salary Increase Of Asha Worker
आशा सेविका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 7:52 PM IST

मुंबई Salary Increase Of Asha Worker : राज्यातील आशा सेविकांच्या (Asha Sevika) मानधन वाढीबाबत मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालय कार्यालयात आशा स्वयंसेविका, संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आरोग्य विभागाने बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक धीरज कुमार, सहसंचालक सुभाष बोरकर, सहसंचालक तुलसीदास सोळंके यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (Public Health System)

आशा सेविकांना भरघोष मानधन : राज्यात 2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत 'आशा सेविका' योजनेची अंमलबजावणी होत आहे. राज्यातील 80 हजारांपेक्षा अधिक आशा सेविका कार्यरत आहेत. आतापर्यंत या आशा सेविकांना 5000 रुपये मानधन देण्यात येत होतं. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज या मानधनात 7000 रुपयांची भरघोस वाढ करण्याची घोषणा केली. या आशा सेविकांना केंद्र शासन स्तरावरूनही 3000 रुपये मानधन दिलं जाणार आहे. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या घोषणेनंतर आशा सेविकांना आता 15,000 रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.

गट प्रवर्तकांना मिळणार 'इतकी' मानधन वाढ : राज्यात 3,664 गट प्रवर्तक कार्यरत असून आतापर्यंत त्यांना 6,200 रुपये मानधन देण्यात येत होतं. त्यामध्ये आरोग्य मंत्र्यांनी आज 6,200 रुपये मानधन वाढ जाहीर केली आहे. गट प्रवर्तकांना केंद्र शासन स्तरावरूनही 8,775 रुपये मानधन मिळत आहे. आता त्यांना 21,175 रुपये इतकं एकत्रित मानधन मिळणार आहे. याशिवाय या बैठकीत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना 2 हजार रुपयांची दिवाळी भेट देणार असल्याचीही घोषणाही सावंत यांनी केली आहे. यामुळे आशा सेविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

आशा सेविकांनी घेतली होती अमित ठाकरे व अजित पवारांची भेट : मानधनात वाढ व इतर प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी एका शिष्टमंडळानं 28 जून, 2020 रोजी मनसे नेते अमित ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर चार दिवसांपूर्वीच राज्य सरकारनं राज्यातील आशा सेविकांच्या मानधनात दोन हजार रुपयांची वाढ केली. मात्र, यासाठी आशा सेविकांना मोठा लढा द्यावा लागला. राज्यातील प्रत्येक शहरापासून ते प्रत्येक खेड्या-पाड्यातील व्यक्तीपर्यंत निरंतर आरोग्य सेवा देणाऱ्या आशा सेविकांकडून सर्वांनाच कामाची आशा आहे. मग, वारंवार आमचीच का निराशा होते? असा प्रश्न या आशा सेविकांनी सरकारला विचारला होता.

हेही वाचा:

  1. Aasha Workers Agitation : सोलापुरात आशा सेविकांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले निवेदन
  2. नांदगाव तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, आशा सेविकांचे सामुदायिक राजीनामे
  3. आशा सेविका शिरल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.