ETV Bharat / state

मुंबईतील देहविक्री करणाऱ्या महिलांना 'साई'चा आधार - mumbai sai foundation news

राज्यात कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरात देहविक्री करणाऱ्या व्यवसायावर परिणाम झाला असून 25 हजार महिलांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, त्यांच्या मदतीसाठी साई संस्था धावून आली आहे.

prostitutes in mumbai
मुंबईतील देहविक्री करणाऱ्या महिलांना 'साई'चा आधार
author img

By

Published : Apr 30, 2021, 7:18 PM IST

मुंबई - जगभर हातपाय पसरवणाऱ्या कोरोना विषाणूमुळे गेल्या एका वर्षांपासून संपूर्ण विश्वात हाहाकार माजवलेला आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरात देहविक्री करणाऱ्या व्यवसायावर परिणाम झाला असून 25 हजार महिलांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, त्यांच्या मदतीसाठी साई संस्था धावून आली असून गेल्या 211 दिवसांपासून अन्न वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे.

प्रतिक्रिया

देहविक्री करणाऱ्या महिलांवर संकट -

देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे देहविक्री करणाऱ्या महिलांच्या व्यवसाय ठप्प आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना सुद्धा, भीतीमुळे ग्राहक येत नव्हते. त्यातच आता पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या मुंबई आणि उपनगरात 25 हजार देहविक्री करणाऱ्या महिलांचे कुटुंब राहत आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीत कुटुंबियांना जगवायचे कसे, असा मोठा प्रश्‍न त्यांच्यासमोर पडलेला आहे. मात्र, मुंबईच्या सामाजिक संस्था साईने पुढाकार घेऊन देहविक्री करणाऱ्या महिलांची आणि त्यांच्या कुटुंबियांची जेवणाची सोय केली आहे. गेल्या वर्षी सुद्धा या साई संस्थेकडून तब्बल 200 दिवस जेवण वितरित केले होते. आता पुन्हा या मोहिमेची सुरूवात केली असल्याची माहिती, सोशल अँक्टिव्हिटीज इंटिग्रेशन संस्थेचे संस्थापक विनय वस्त यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहेत.

दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावेत -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात गेल्या एका वर्षापासून आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली आहे. मुंबईत आणि मुंबई उपनगरात जवळजवळ 25 हजार महिला देहविक्री व्यवसाय करतात. त्यांना सुद्धा कोरोनाचा मोठा फटका बसलेला आहे. देहविक्री व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. देहविक्री करणाऱ्या महिला सुद्धा आपल्या समाजाचा एक भाग आहे. सध्या त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन त्यांना मदत करावी, तसेच शासनाने सुद्धा यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन साई संस्थेकडून करण्यात आले आहे.

एचआयव्हीबाधितांना मदत -

देहविक्री करणाऱ्या महिला सुद्धा समाजाचा एक भाग आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी आणि पुनर्वसनासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कोरोना विषाणूमुळे मुंबईसह राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा कामाठीपुराऱ्यातील देहविक्री करणाऱ्या महिलांना दररोज जेवणाचे पॉकेट वितरित करण्यात येत आहे. इतकेच नव्हे, तर या परिसरातील एचआयव्हीबाधित महिलांच्या आरोग्याचीदेखील काळजी घेत असल्याचे विनय वस्त यांनी सांगितले.

हेही वाचा - मदतीचा हात... 'दागिने विका, दागिने घरात राहून डबल होणार नाहीत', मुंंबईचा ऑक्सिजनमॅन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.