ETV Bharat / state

सर्व पक्ष व धर्म यांच्यापलीकडे राष्ट्रमंदिरासाठी अभियान सुरू - साध्वी ऋतंभरा

author img

By

Published : Jan 15, 2021, 7:36 PM IST

इतक्या वर्षांचा गौरव पूर्ण लढा आहे तो राष्ट्र मंदिराच्या म्हणजेच राम मंदिराने पूर्ण होतोय. प्रभू श्री राम यांचे मंदिर बनवण्यासाठी आम्ही दारोदारी जाणार आहोत. अयोध्येत उभारले जात असलेल्या भव्य राम मंदिरासाठी देशातील प्रत्येक रामभक्ताचा सहभाग राम मंदिर निर्माणासाठी व्हावा, म्हणून साडेचार लाख गावांमध्ये अकरा कोटी कुटुंबांची म्हणजेच पन्नास ते साठ कोटी लोकांपर्यंत गावोगावी-शहराशहरांत हे अभियान विश्व हिंदू परिषदेचे स्वयंसेवक जाऊन करणार आहेत, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे.

राम मंदिर निर्माण अभियान न्यूज
राम मंदिर निर्माण अभियान न्यूज

मुंबई - अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारणीसाठी, रामभक्त आणि सर्वांचा हातभार लागावा यासाठी, विश्व हिंदू परिषदेने 'श्री राम जन्मभूमी मंदिर व धनसंग्रह व संपर्क अभियान' सुरू केले आहे. हे अभियान 15 जानेवारीपासून सुरू झाले ते 27 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. कशाप्रकारे हे अभियान राबवणार आहे, याविषयी आज श्रीराम जन्मभूमी मुक्ती संग्राम आंदोलनाच्या प्रमुख साध्वी ऋतंभरा यांच्यासह विश्व हिंदू परिषद मुंबई यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

सर्व पक्ष व धर्म यांच्यापलीकडे राष्ट्रमंदिरासाठी अभियान सुरू - साध्वी ऋतंभरा

हेही वाचा - कोल्हापूर : झेडपीच्या सर्वांत मोठ्या डिजिटल शाळेचे उद्या शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

प्रभू श्री राम यांचे मंदिर बनवण्यासाठी आम्ही दारोदारी जाणार

इतक्या वर्षांचा गौरव पूर्ण लढा आहे तो राष्ट्र मंदिराच्या म्हणजेच राम मंदिराने पूर्ण होतोय. प्रभू श्री राम यांचे मंदिर बनवण्यासाठी आम्ही दारोदारी जाणार आहोत. लाखो लोकांच्या मनात राम आहे. त्यामुळे सर्वांचं योगदान असावं यासाठी आम्ही सर्व पक्ष आणि धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांचे हातभर याला लागावे म्हणून वर्गणीसाठी जाणार आहोत. ज्यावेळेस राम मंदिराचा इतिहास रचला जात होता, त्यावेळी आमचा पूर्वजांचे देखील त्यात योगदान होते, असं सर्वाना वाटावं म्हणून आम्ही हे तुमचे योगदान घेतोय. हे अभियान चालवण्याचा हाच संकल्प आमचा आहे. तसेच, श्रीरामाच्या जन्मभूमीवर बनवत असलेले भव्य राम मंदिर हे कोणा एका परिवार संघटनेचे मालकीचे नसून ते अखंड हिंदुस्तानाचे श्रद्धा व शक्ती केंद्र आहे. त्यामुळे सर्वांनी यथाशक्ती योगदान करावे, असे साध्वी ऋतंभरा यांनी सांगितले .

प्रत्येक रामभक्ताचा सहभाग राम मंदिर निर्माणासाठी व्हावा, यासाठी अभियान

अयोध्येत उभारले जात असलेल्या भव्य राम मंदिरासाठी देशातील प्रत्येक रामभक्ताचा सहभाग राम मंदिर निर्माणासाठी व्हावा, म्हणून साडेचार लाख गावांमध्ये अकरा कोटी कुटुंबांची म्हणजेच पन्नास ते साठ कोटी लोकांपर्यंत गावोगावी-शहराशहरांत हे अभियान विश्व हिंदू परिषदेचे स्वयंसेवक जाऊन करणार आहेत. तसेच, यात दहा रुपयांपासून ते लाखो रुपये देणगी लोक देतील. त्याच्या पावत्या देखील दिल्या जाणार आहेत. या अभियानात राममंदिराच्या लढ्यात पूर्वीपासून या असणारे मोठे मान्यवर देखील या अभियानात सहभागी होणार आहेत. जसे की, ऋतंभरराजी काही दिवस मुंबईत हे अभियान करतील. यानंतर त्या पुण्याला जातील, अशी माहिती श्रीराज नायर विश्व हिंदू परिषद मुंबई प्रवक्ते यांनी सांगितले.

हेही वाचा - मकर संक्रांतीला सुरू होणार अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.