ETV Bharat / state

Sadhvi Pragya Singh Thakur : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी घेतला अर्ज मागे; मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी दोषमुक्तीचा केला होता अर्ज - Accused Ex Colonel Prasad Purohit

मालेगाव खटल्यातील आरोपींनी अखेर मुंबई उच्च न्यायालयातील आपली दोषमुक्तीची याचिका मागे घेतली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात सुरू असलेल्या संबंधित खटल्यात 288 साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवण्यात आले ( Acquittal Plea in The Bombay High Court ) आहेत. खटल्याच्या या टप्प्यावर दोषमुक्त करण्याच्या तुमच्या याचिकेवर सुनावणी घेतली जावी का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी या खटल्यातील आरोपीं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह इतर आरोपींना केली.

Sadhvi Pragya Singh Thakur
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी घेतला अर्ज मागे
author img

By

Published : Dec 1, 2022, 5:30 PM IST

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील ( Malegaon Blast 2008 Case ) मुख्य आरोपी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, आरोपी माजी कर्नल प्रसाद पुरोहित, आरोपी समीर कुलकर्णी या तिन्ही आरोपींनी उच्च न्यायालयात दाखल केलेला दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाने विचारल्यानंतर आज मागे घेण्यात आले आहेत. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात सुरू असलेल्या ट्रायलमध्ये 288 हून अधिक साक्षीदारांचे जबाब आतापर्यंत नोंदवण्यात आले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयातील आपली दोषमुक्तीची याचिका आरोपींनी घेतली मागे : मालेगाव ब्लास्ट 2008 मधील खटल्यातील आरोपींनी अखेर मुंबई उच्च न्यायालयातील आपली दोषमुक्तीची याचिका मागे घेतली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात सुरू असलेल्या संबंधित खटल्यात 288 साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवण्यात आले आहेत. खटल्याच्या या टप्प्यावर दोषमुक्त करण्याच्या तुमच्या याचिकेवर सुनावणी घेतली जावी का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी या खटल्यातील आरोपी माजी कर्नल प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णीसह अन्य आरोपींनी अर्ज केला होता. याचे सकारात्मक उत्तर न सापडल्याने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि समीर कुलकर्णी यांनी आपल्या दोषमुक्तीच्या याचिका मागे घेतल्या आहेत. तर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहीत मात्र आपल्या याचिकेवर ठाम आहेत. त्यांनी केवळ या खटल्याला केंद्र सरकारने दिलेल्या मंजुरीविरोधातील आपली याचिका मागे घेतली आहे.

खटल्यावर सुनावणी सुरू असताना दोषमुक्तीची याचिका योग्य की अयोग्य : मुंबई सत्र न्यायालयात हा खटला सुरू होण्यापूर्वीच लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, समीर कुलकर्णी आणि भोपाळहून भाजपच्या विद्यमान खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी प्रकरणातून दोषमुक्त करण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, राष्ट्रीय तपास यंत्रणा कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने त्यांचा हा अर्ज फेटाळून लावून खटल्याला सुरुवात केली होती. त्यानंतर आरोपींनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आवश्यक त्या मंजुरीविनाच आपल्यावर कारवाई केल्याचा दावा या आरोपींनी करीत या प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी केली होती. प्रसाद पुरोहित यांनी तर हा खटला चालवण्यास केंद्र सरकारने दिलेल्या मंजुरीलाही मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलेले होते.

मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले हे निरीक्षण : या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी खटल्याच्या मंजुरीचा मुद्दा आता उपस्थित होऊच शकत नाही कारण खटला सुरू झाल्याने आता तो मागे पडला आहे. त्यामुळे खटल्याच्या या टप्प्यावर आरोपींच्या दोषमुक्त करण्याच्या मागणीचा विचार केला जाऊ शकतो का? तसे दाखवणारे काही न्यायानिवाडे दाखवा? अशी विचारणा हायकोर्टाने पुरोहित आणि कुलकर्णी यांना केली होती.

पुरोहित यांच्यावरील खटल्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण : त्यावेळी पुरोहित यांच्यावर खटला चालवण्याची दखल घेणे हेच कायद्याने चुकीचे आहे. कारण ते लष्करी अधिकारी असून, त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारीच पार पाडत होते. त्याचा कागदोपत्री पुरावाही न्यायालयात सादर करण्यात आला आहे, असा दावा पुरोहित यांच्यातर्फे करण्यात आला. त्यावर आरडीएक्ससारखी स्फोटके पुरवणं हेही पुरोहित यांच्या कामाचा भाग होता का? असा प्रतिसवाल न्यायालयाने उपस्थित केला होता. तेव्हा तपासयंत्रणेच्या दबावाखाली साक्ष दिल्याचे एका साक्षीदाराने एनआयएला सांगितल्याचा दावा पुरोहित यांच्यातर्फे करण्यात आला. त्यानंतर एनआयएचा तुमच्या म्हणण्याला पाठिंबा असल्याचे तुमचे म्हणणे आहे का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने करताच त्याला पुरोहित यांच्यावतीने नकारार्थी उत्तर देण्यात आले.

देशात हिंदू दहशतवाद जन्माला आणणारा शब्द मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणापासून : देशात हिंदू दहशतवाद जन्माला आणणारा शब्द मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणापासून अस्तित्वात आला होता. आतापर्यंत 30 जणांनी या खटल्यात साक्ष बदलली आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी सध्या एनआयएच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या सुनावणीतही एनआयएने हजर केलेल्या साक्षीदाराने साक्ष बदलली होती.

काय आहे प्रकरण : 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर या या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.