मुंबई : Sachin Tendulkar: मुंबईतील वरळी येथे डीपी वर्ल्डच्या (World Cup 2023) वतीने क्रिकेट खेळणाऱ्या छोट्या क्रिकेटपटूंना क्रिकेटचे साहित्य म्हणजेच किट उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी सचिन तेंडुलकर यांनी सुमारे 50 छोट्या क्रिकेटपटूंना किटचे वाटप (Cricket Kits) केले. या छोट्या क्रिकेटपटूंची बोलताना सचिन तेंडुलकर अतिशय भाऊक पणे त्यांना क्रिकेटमधील बारकावे सांगत होते. कोण काय खेळते याची आस्थेने चौकशी करत होते. यावेळी सचिन तेंडुलकर यांच्याकडून किट स्वीकारल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. साक्षात क्रिकेटच्या देवाकडून किट स्वीकारून मुलांनी अतिशय आनंद व्यक्त केला.
सचिन तेंडुलकर यांनी गुगली शिकवली : क्रिकेटचे किट वाटप करताना सचिन तेंडुलकरने स्वतःहून कृष्णा कुठे आहे अशी हाक मारली. त्याबरोबर एक छोटा दहा वर्षाचा मुलगा समोर आला. सचिन म्हणाले की, या कृष्णाला मी ओळखतो. हा चांगला खेळतो आणि त्यांनी कृष्णाला जवळ घेतले. यानंतर कृष्णाला विचारले असता कृष्णा म्हणाला की, माझे नाव कृष्णा संतोष आहे. मी क्रिकेट खेळतो मला गोलंदाजी करायला खूप आवडते. परंतु मला ऑल राऊंडर व्हायचे आहे. सचिन सरांनी स्वतः मला गुगली कशी टाकायची हे शिकवले आहे. त्यांनी जेव्हा माझे नाव घेतले. तेव्हा मला खूप आनंद झाला. त्यांच्याकडून क्रिकेट शिकण्यात मी अतिशय उत्साही होतो. मला पुढे जाऊन त्यांच्यासारखेच क्रिकेटर बनायचे आहे. असे क्रिकेटपटू कृष्णा संतोष यांनी सांगितले.
सचिन तेंडुलकर वॉल ची निर्मिती : डीपी वर्ल्डच्या वतीने क्रिकेटपटूंना क्रिकेट किटचे वाटप करण्यात आले. मुंबईत एका कंटेनरमध्ये 50 किट होते. देशभरातील विविध पाच ठिकाणी अशा किडचे वाटप केले जाणार असून अडीचशे नव क्रिकेटपटूंना हे किट दिले जाणार असल्याचे, डीपी वर्ल्डच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी सचिन तेंडुलकर यांचे भव्य चित्र असलेली आणि त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीची माहिती देणारी एक वॉल तयार करण्यात आले होते.
हेही वाचा -