मुंबई - शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्याकडून मागील काही दिवसांपासून करण्यात येत असलेल्या विधानामुळे महाआघाडीतील वातावरण तापत आहे. आज त्यात पुन्हा त्यांच्या विधानाची भर पडली आहे. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी एक नवीन वादग्रस्त विधान केल्याने महाआघाडीत पुन्हा तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, माफी न मागता अभिमानाने शिक्षा भोगणाऱ्या सर्वांना भारतरत्न द्यावा लागेल, असे ट्विट काँग्रेस प्रवक्ते संचिन सावंत यांनी केले आहे.
सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना शिक्षा द्या, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर योगेश शुक्लासारख्या अनेकांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगून गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चळवळीत भाग घेतल्याचे सांगत या सर्वांना भारतरत्न द्यावा लागेल, अशी भूमिका सावंत यांनी ट्वीटद्वारे मांडली आहे.
-
काळ्यापाण्याची शिक्षा भोगणारे १९०९-२१ या कालावधीत १४९, २२- ३१ काळात ३० व ३२ ते १९३८ काळात ३८६ लोक होते. यामध्ये योगेश शुक्लासारख्या अनेकांनी शिक्षा भोगून गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चळवळीत भाग घेतला. माफी न मागता अभिमानाने शिक्षा भोगणाऱ्या सर्वांना भारतरत्न द्यावे लागेल.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">काळ्यापाण्याची शिक्षा भोगणारे १९०९-२१ या कालावधीत १४९, २२- ३१ काळात ३० व ३२ ते १९३८ काळात ३८६ लोक होते. यामध्ये योगेश शुक्लासारख्या अनेकांनी शिक्षा भोगून गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चळवळीत भाग घेतला. माफी न मागता अभिमानाने शिक्षा भोगणाऱ्या सर्वांना भारतरत्न द्यावे लागेल.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 18, 2020काळ्यापाण्याची शिक्षा भोगणारे १९०९-२१ या कालावधीत १४९, २२- ३१ काळात ३० व ३२ ते १९३८ काळात ३८६ लोक होते. यामध्ये योगेश शुक्लासारख्या अनेकांनी शिक्षा भोगून गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चळवळीत भाग घेतला. माफी न मागता अभिमानाने शिक्षा भोगणाऱ्या सर्वांना भारतरत्न द्यावे लागेल.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 18, 2020