ETV Bharat / state

'26/11 च्या दहशतवादी हल्ल्याची फेरचौकशीची मागणी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा'

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या पुस्तकात 26/ 11 च्या हल्ल्याबाबत काही खुलासे करण्यात आले आहेत. या आधारे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या हल्ल्याच्या फेरचौकशीची मागणी केली आहे, त्यावर सावंत यांनी उत्तर दिले.

Sachin Sawant
सचिन सावंत
author img

By

Published : Feb 19, 2020, 9:59 PM IST

Updated : Feb 19, 2020, 11:44 PM IST

मुंबई - शहरात झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याची फेरचौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे. यावर ही मागणी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या पुस्तकात 26/11 च्या हल्ल्याबाबत काही खुलासे करण्यात आले आहेत. या आधारे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या हल्ल्याच्या फेरचौकशीची मागणी केली आहे. त्यावर सावंत यांनी उत्तर दिले.

सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते

मालेगाव बॉम्बस्फोट, समझोता एक्सप्रेस इत्यादी दहशतवादी हल्ल्यांच्या आरोपींना भाजपने पाठीशी घातले. या आरोपींना सोडण्याकरता सरकारी वकिलांवर दबाव आणणाऱ्या भाजपाकडून 26/11 च्या फेर चौकशीची मागणी करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असे सावंत यांनी म्हटले आहे. 26/11 चा तपास पूर्ण होऊन अजमल कसाबला फाशीही दिली गेली आहे. त्यानंतर आता आज फेर चौकशीची मागणी करणारे ज्यावेळी राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार होते त्यावेळी विटीदांडू खेळत होते का? अशी टीकाही त्यांनी केली.

यापेक्षा भाजप नेत्यांचे काश्मीरमध्ये अतिरेक्यांसोबत पकडलेल्या दविंदरसिंगसोबत काय संबंध आहेत, तसेच संघाचा मालेगाव बॉम्बस्फोटाशी काय संबंध आहे, याची प्रामाणिक चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सावंत यांनी केली.

निवृत्त पोलीस अधिकारी राकेश मारिया यांच्या पुस्तकात अजमल कसाबच्या आरोपपत्रात नमूद केलेल्या मजकुराशिवाय कोणताही नवीन मजकूर आलेला नाही. कसाबने आपल्या कबुली जबाबात पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबातर्फे त्यांना हिंदू नावाचे ओळखपत्र आणि हातात बांधायला लाल धागे दिले होते, असे सांगितले आहे. त्याचे कारण एका अतिरेक्याने त्यांना विचारले असता, या ओळखपत्र व धाग्यांमुळे पोलिसांना गुंगारा देता येईल, असे उत्तर त्याने दिले होते. हे कसाबच्या कबुली जबाबात स्पष्टपणे नमूद आहे.

तर राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात याबाबत असे म्हटले आहे की, जर अजमल कसाब जिवंत सापडला नसता, तर माध्यमांनी त्याला हिंदू म्हणून घोषीत केले असते. यामध्ये कुठल्याही तऱ्हेचे कट, कारस्थान वा सरकारचा दबाव होता, असा आरोप मारिया यांनी केलेला नाही. ते केवळ माध्यमांबाबत बोलत आहेत. याचबरोबर आरोपपत्रात या सगळ्या गोष्टी अगोदरच नमूद असताना आज भाजपने केवळ राजकीय चिखलफेक करण्याकरता खोटारडेपणा व हिन दर्जाच्या राजकारणाचा आधार घेतलेला असल्याचेही सावंत यांनी नमूद केले.

  • भातखळकर या पत्रात म्हणतात की...

राम प्रधान यांनी सदर मुलाखतीत हे मान्य केलेले आहे की, त्या हल्ल्यात जे लोकल कनेक्शन मिळत होते ते तुम्ही उघड करु नका, अशा प्रकारचा आदेश तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनी आपल्याला दिला होता. सदर मुलाखतीत अशा तऱ्हेचा कोणताही उल्लेख नाही. राम प्रधान यांनी या मुलाखतीत असे म्हटले आहे की, चिदंबरम यांना आमच्या समितीचा रिपोर्ट पाहायला पाहिजे होता. यासंदर्भात या रिपोर्टसह आम्ही काही संवेदनशील माहिती वेगळ्या टिप्पणीव्दारे सादर केली. पण, गृहखात्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि नंतर डेव्हीड हेडली संदर्भातील बातम्या आल्या. केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे राम प्रधान यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन झालेली नव्हती. तर ती राज्य सरकारच्या आदेशाने झाली होती. त्यामुळे सदर टिप्पणीची दखल घेतली आहे की नाही, हे केंद्रीय गृहमंत्रालयाला राम प्रधान यांना सांगणे बंधनकारक नव्हते. त्याचबरोबर या मुलाखतीमध्ये भातखळकरांच्या सांगण्यानुसार राम प्रधान यांनी त्यांच्यावरती दबाव आणला किंवा सदर कनेक्शन उघड करु नका, असे आदेश दिला असा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे भाजपाकडून सदरचे पत्र हा कांगावा असल्याचे सावंत यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले.

Last Updated : Feb 19, 2020, 11:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.