ETV Bharat / state

नकट्या नटीने लाल चौकातील न फडकलेल्या तिरंग्यासाठी संतापाच्या ठिणग्या उडवाव्यात - शिवसेना वि. कंगना न्यूज

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपा आणि कंगणाला लक्ष करण्यात आले आहे. 370 हटवल्यानंतरही काश्मीरमध्ये तिरंगा फडकवता येत नसेल तर ते दिल्ली सरकारचे अपयश आहे अशी टिका करण्यात आली आहे. त्याच वेळी मुंबईला पाक व्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनालाही फटकारले आहे.

Saamna Editorial on Kashmir BJP and kangana
नकट्या नटीने लाल चौकातील न फडकलेल्या तिरंग्यासाठी संतापाच्या ठिणग्या उडवाव्यात, शिवसेनेची टीका
author img

By

Published : Oct 28, 2020, 8:43 AM IST

Updated : Oct 28, 2020, 9:19 AM IST

मुंबई - काश्मीरात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. म्हणजे तेथे दिल्लीचा हुकूम चालतो, पण लाल चौकात तिरंगा फडकवणे हा गुन्हा ठरला. मग 370 कलम हटवल्यावर नक्की बदलले काय? हिंदुत्वाचा संबंध राष्ट्रीयत्वाशी येतो. एखाद्या भूमीवर तिरंगा फडकवण्यास बंदी आहे याचा सरळसोट अर्थ असा की, त्या भूमीचे आम्ही स्वामी नाही. त्या भूमीवर दुसऱ्याच कुणाचा तरी हुकूम चालत आहे. ते हुकूमबाज एकतर दहशतवादी आहेत अथवा परके आहेत, अशा शब्दात सामना अग्रलेखातून थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच मुंबईत आजही तिरंगा फडकतोय. म्हणजे हा भाग पाकड्यांचा नाही. जिथे पाकड्यांची मिजास चालते तेथेच तिरंग्याचा अपमान होतो. नकट्या नटीने लाल चौकातील न फडकलेल्या तिरंग्यासाठी संतापाच्या ठिणग्या उडवाव्यात. खरी मर्दानगी व मर्दानी तिथेच आहे, अशा शब्दात अभिनेत्री कंगना रणौतलाही नाव न घेता तिलाही सुनावले आहे.

आजच्या सामन्याच्या अग्रलेखात काय म्हटलंय?

काश्मीरात नक्की काय सुरू आहे याबाबत शंकाकुशंकांना खतपाणी मिळणाऱया घटना, घडामोडी रोज घडताना दिसत आहेत. काश्मीरबाबत देशवासीयांच्या भावना तीक्र आहेत. काँग्रेसच्या काळात काश्मीर हातातून गेलेच होते ते भाजपने परत मिळवले हे जे सांगितले जाते ते खरे असेल तर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यास विरोध का करण्यात आला? याचे उत्तर देशाला मिळायला हवे.

काश्मीरची स्थिती अजूनही सुधारलेली नाही

काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे हे सिद्ध करण्यासाठीच मोदी सरकारने ३७० कलम हटवून काश्मीरच्या पायांतील गुलामीच्या बेड्या तोडून फेकल्या. त्याबद्दल सगळ्यांनीच कौतुकाचा वर्षाव केला. ३७० कलम हटवून भारतमातेचा गुदमरलेला श्वास मोकळा केला. हे सर्व मोदी व शाह यांचे राज्य दिल्लीत असल्यामुळेच घडले, पण ३७० कलम हटवूनही भाजपा कार्यकर्त्यांना चारेक दिवसांपूर्वी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवता आला नाही. लाल चौकात तिरंगा फडकवण्यास गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांना काश्मीरच्या पोलिसांनी रोखले व बंदी बनवले. हे चित्र काय सांगते? म्हणजेच कश्मीरची स्थिती अजूनही सुधारलेली नाही.

त्यांची ‘डराव डराव’ सुरू आहे

जे बरे दिसत आहे तो फक्त वरवरचा मेकअप आहे. आता काश्मीरातील तीन प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत व त्यांनी ३७० कलम पुन्हा आणण्यासाठी लढा उभारण्याचे ठरवले आहे. डॉ. फारुख अब्दुल्ला या बेडकाने तर ‘डराव डराव’ करत असे जाहीर केले की, ३७० कलम पुन्हा आणण्यासाठी आम्ही चीनची मदत घेऊ. हा सरळसरळ राष्ट्रद्रोहच आहे. दुसरी ती बेडकीण मेहबुबा मुफ्ती. तिने तर ‘काश्मीरात तिरंगा कसा फडकतो ते पाहू’ असे आव्हान दिले आहे.

पंडितांची घरवापसी हे गौडबंगाल

आजही काश्मीरात तिरंगा फडकवण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर कसे व्हायचे? ३७० कलम हटविल्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’ आहे व लोकांवर बंधने आहेत. लष्कराचा बंदोबस्त पूर्वीपेक्षा जास्त वाढला आहे. दहशतवादी हल्ल्यांचे भयही जास्त निर्माण झाले आहे. ३७० कलम हटवताच काश्मिरी पंडितांची घरवापसी होईल, पंडितांना त्यांचा जमीनजुमला परत मिळेल असे वातावरण भाजपाने निर्माण केले. प्रत्यक्षात किती पंडितांची घरवापसी झाली हे गौडबंगाल आहे. भारतीय जनता पक्षाचे काम करणाऱ्यांच्या हत्या याच काळात केल्या गेल्या हे दुर्दैव आहे.

एक रुपयाचीही गुंतवणूक नाही

३७० कलम असताना बाहेरच्या लोकांना येऊन तेथे एक इंच जमीन घेता येत नव्हती. बाहेरच्यांना तेथे जाऊन उद्योग, व्यापार करता येत नव्हता. त्यामुळे ३७० कलम काढल्यानंतर तेथे व्यापार, उद्योग वाढेल असे चित्र निर्माण केले होते. काही बड्या उद्योगपतींनी देशभक्तीने प्रेरित होऊन कश्मीरात मोठी गुंतवणूक करण्याचेही जाहीर केले, पण वर्ष उलटून गेले तरी तेथे एक रुपयाचीही गुंतवणूक होऊ शकलेली नाही. बेरोजगारीने वैफल्यग्रस्त झालेले तरुण पुन्हा जुन्याच अतिरेकी मार्गाने निघाले आहेत व ‘३७०’ प्रेमी पुढारी या तरुणांची डोकी भडकवीत आहेत.

Last Updated : Oct 28, 2020, 9:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.