मुंबई : शहरात भरधाव वाहने अनेकांचे जीव घेत आहेत. दु:खाने अंतःकरणाने धावपटू आणि जॉगर्स यांनी पोलीसांना सांगितले की, आमच्याचपैकी एकाने भीषण कार अपघातात जीव गमावला आहे. राजलक्ष्मी उर्फ राजी ही स्ट्रीडर्ससोबत धावणारी उत्साही धावपटू होती. रविवारी सकाळी साडेसहा वाजता वरळी सी-फेसजवळ राजी तिच्या नेहमीच्या मार्गावरून धावत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने तिला धडक दिली. राजी अनेक फूट हवेत उडाली होती. त्यांनतर ती खाली पडली, तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, अशी माहिती जमलेल्या धावपटूंनी दिली.
सीसीटीव्ही फुटेज तपासले का : प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार चालक (23 वर्षीय तरुण) बेपर्वाईने वेगात होता. तो नशेत होता का? याची माहित नाही, पण वैद्यकीय तपासणीचे निकाल अजून आलेले नाहीत. 19 मार्च रोजी सकाळी नेमके काय घडले, याची माहिती सीसीटीव्ही फुटेजमधून मिळणार आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासले का? असा सवाल देखील जमलेल्या धावपटू आणि जॉगर्स यांनी पोलिसांना विचारला आहे.
वरळी पोलीस स्टेशनबाहेर निदर्शने : या शहरात मानवी जीवनाची किंमत आहे का? आम्हाला चालायला आणि धावायला रस्ते सुरक्षित असतील का? पोलीस वेळीच आणि योग्य ती कारवाई करतील का? राजीच्या कुटुंबाला आणि आमच्या धावपटू समाजातील सर्वांना न्याय मिळेल का, की बेपर्वा ड्रायव्हर सुटका होईल? असे अनेक सवाल जमलेल्या धावपटू आणि जॉगर्सने वरळी पोलिसांना विचारले आहेत. धावपटू आणि जॉगर्सने वरळी पोलीस स्टेशनबाहेर निदर्शने केली.
सहकारी महिलेच्या मृत्यूच्या जाब : आज 20 मार्चला सकाळी 6वाजता शिवाजी पार्क गेट क्रमांक 1 वर जमून धावपटू आणि जॉगर्स यांनी एकजूट दाखवली. त्यांनी योग्य कारवाईची मागणी करत वरळी पोलीस ठाण्यासमोर जाऊन वरळी पोलिसांना आपल्या सहकारी महिलेच्या मृत्यूच्या जाब विचारला आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास धावपटू आणि जॉगर्स वरळी पोलीस ठाण्यासमोर एकत्र येऊन पोलिसांकडे आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.