मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. जागतिक महामारी बनलेल्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ते रोखण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मुंबई स्थानिक प्रशासनासोबत एकत्र येत मुंबईत covid-19 स्क्रीनिंगचा एक सामाजिक अभियान सुरू करत आहे.
मुंबईतील लोकसंख्या आणि भौगोलिक स्थिती पाहता अभियानाची व्यापकता वाढणार आहे. त्यामुळे लोकांच्या सहकार्याची आवश्यकता असणार आहे . त्यामुळे चला आपण मुंबईला सहकार्य करू वन वीक फोर द नेशन, या अभियानात जोडले जाऊ असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघकडून करण्यात आलेले आहे.
या अभियानात जोडले गेल्यावर सुरक्षा म्हणून तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण सहभागी व्यक्तीला दिले जाणार आहे. तसेच स्वतःच्या सेफ्टीसाठी पीपीई किट देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देण्यात येणार आहेत. या अभियानात जोडण्यासाठी आपल्याला संघाकडून एक गुगल डॉक्स फॉर्म भरावा लागणार आहे. या अभियानात कोण कोणाला सामील होता येणार आहे, याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. वय वर्ष 20 ते 45 वर्षाच्या दरम्यानच्या व्यक्तीला सहभागी होता येणार आहे. मधुमेह, उच्च रक्त दाब, दमा आणि अन्य रोग नसलेला व्यक्ती या अभियानात जोडला जाऊ शकतो. अभियानात जोडलेल्या सर्वांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे कमीत कमी सात दिवस घराच्या बाहेर राहण्याची तयारी अभियानात सहभागी होणाऱ्या व्यक्तीची असायला हवी, अशा सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देण्यात आलेल्या आहेत.
डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांची रुग्णालयात कमतरता भासत आहे. त्यामुळे इच्छुक आणि यात पदव्युत्तर आहे त्यांनी आपल्याला या क्षेत्रात काम करायला मिळाले नाही. त्यामुळे आता दुसऱ्या क्षेत्रात काम करत आहेत अशांनी या कोरोनाच्या संकटात लढण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करायला पुढे यायला हवं, असं आवाहन करत यापूर्वी राज्य सरकारकडून अभियान राबवलं होतं. त्यात राज्यातील हजारो लोकांनी सहभाग नोंदवला होता. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील आता कोव्हिड स्क्रीनिंगसाठी असं अभियान राबवत आहे.
या अभियानात जोडण्यासाठी खालील लिंकवर अर्ज भरून द्यावयाचा आहे -
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSewCcygTwE2eXQ8yMJ56Lt9CDQ8CfA4W8-OvdMprjdNOyw75A/viewform
आरएसएसकडून प्रशासनाला मदतीकरिता 'वन वीक फोर द नेशन' अभियान, नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. जागतिक महामारी बनलेल्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वन वीक फोर द नेशन हे अभियान राबविले जाणार आहे. यात सामील होण्यासाठी संघाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. मुंबईतील लोकसंख्या आणि भौगोलिक स्थिती पाहता अभियानाची व्यापकता वाढणार आहे.