ETV Bharat / state

दुर्मिळ आजारातून धैर्यराज होणार बरा; लाखो दात्यांच्या मदतीने मिळाले 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन - धैर्यराज झोलजेन्स्मा इंजेक्शन बातमी

गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणाऱ्या राजदीप सिंह राठोर यांचा पाच महिन्याचा मुलगा धैर्यराज हा 'स्पायनल मस्क्युलर एस्ट्रॉफी' या आजाराचा सामना करत आहे. त्याच्या उपचारांसाठी १६ कोटी रुपयांच्या इंजेक्शनची आवश्यकता होती. क्राऊड फंडिंगच्या मदतीने हे इंजेक्शन मिळाले आहे.

Dhairyaraj zolgensma injection fund news
धैर्यराज झोलजेन्स्मा इंजेक्शन बातमी
author img

By

Published : May 6, 2021, 8:03 AM IST

मुंबई - दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या गुजरातमधील अवघ्या साडे पाच महिन्यांच्या धैर्यराजला अमेरिकेहून मागवण्यात आलेले 16 कोटी रुपयांचे ‘झोलजेन्स्मा’ इंजेक्शन देण्यात आले. हा चिमुरडा सध्या मुंबईतील माहिमच्या पी. डी. हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत आहे. धैर्यराजला बुधवारी सकाळी ११ वाजता इंजेक्शन हे देण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. या चिमुकल्याला आज(गुरुवारी) रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, अशी माहिती हिंदुजा रुग्णालयाच्या चाईल्ड न्युरोलोजिस्ट डॉ. निलू देसाई यांनी ईटीव्ही भारताला दिली.

७१ दिवसात उभारली निधी -

गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणाऱ्या राजदीप सिंह राठोर यांचा पाच महिन्याचा मुलगा धैर्यराज एका दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. धैर्यराजला स्पायनल मस्क्युलर एस्ट्रॉफी (एसएमए) हा आजार झाला होता. या चिमुकल्याच्या उपचारासाठी कोट्यवधी रुपयांची गरज होती. धैर्यराज पालकांनी आपल्या मुलांचे प्राण वाचविण्यासाठी समाज माध्यमांवर मदत करण्याचे आवाहन करून 'क्राऊड फंडिंग'ची मोहीम चालवली. त्याला देशभरातून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अवघ्या ७१ दिवसांत १६ कोटी २४ लाख ३५ हजार ६५५ रुपये जमा झाले. या क्राऊड फंडिंगमध्ये धैर्यराजच्या मदतीला २ लाख ६४ हजार ६६० नागरिक समोर आले आहे. त्यामुळे धैर्यराजचे प्राण वाचले आहेत. धैर्यराजच्या आई-वडिलांनी मदत करणाऱ्या लाखो दात्यांचे आभार मानले आहेत.

१६ कोटी रुपयांचे इंजेक्शन -

धैर्यराजला 'स्पायनल मस्क्युलर एस्ट्रॉफी' (एसएमए) हा दुर्मीळ आणि दुर्धर आजार झालेला आहे. या दुर्मीळ आजारामध्ये, प्रोटीन तयार करण्यासाठी शरीरामध्ये जो जीन असणे अपेक्षित असते, तो नसल्याने गुंतागुंत निर्माण होते. या आजारावर जीन रिप्लेसमेंट करावे लागते. यासाठी ‘झोलजेन्स्मा’ इंजेक्शन लागते. या इंजेक्शनची किंमत 16 कोटी रुपये आहेत. हे इंजेक्शन अमेरिकेत तयार केले जाते. त्यामुळे या आजारावर उपचारासाठी खर्च फार मोठा आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना झेपणार हा खर्च नाहीत. धैर्यराजसाठी नागरिकांनी मदत केली आहेत. त्यामुळे आज धैर्यराजचे प्राण वाचले.

धैर्यराजला मिळणार रुग्णालयातून सुट्टी -

‘झोलजेन्स्मा’ नावाचे इंजेक्शन हे अमेरिकेतून मागविण्यात आले आहे. तब्बल 15 दिवसनांतर इंजेक्शन मुंबईत दाखल झाले असून बुधवारी सकाळी 11 वाजता धैर्यराजला हे इंजेक्शन देण्यात आले. धैर्यराज 24 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. सध्या त्याची प्रकृती सामान्य आहे. आज धैर्यराजला रुग्णालयातून सुट्टी दिला जाईल, अशी माहिती हिंदुजा रुग्णालयाच्या चाईल्ड न्युरोलोजिस्ट डॉ. निलू देसाई यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.