ETV Bharat / state

आरपीआयचे कार्यकर्ते नाराज; महायुतीच्या उमेदवारांना बसणार फटका?

नाराज झालेल्या रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी महायुतीमधील उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या उमेदवारांना याचा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. आरपीआयच्या मानखुर्द शिवाजी नगरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी शिवाजी नगर मतदार संघापुरती मर्यादित नसून महाराष्ट्रात सर्वत्र पोहचली आहे.

आरपीआयचे कार्यकर्ते नाराज
author img

By

Published : Oct 12, 2019, 3:21 PM IST

मुंबई - महायुतीमधील रिपाइंच्या वाट्याला आलेल्या जागांवरही युतीमधील इतर पक्षांनीच उमेदवार उभे केल्याने रिपाईच्या उमेदवारांना ऐनवेळी माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या रिपाईच्या कार्यकर्त्यांनी महायुतीमधील उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या उमेदवारांना याचा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज असताना आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मात्र युतीच्या प्रचारात उपस्थित राहत असल्याचे दिसत आहे.

आरपीआयचे कार्यकर्ते नाराज

यामुळे महायुतीकडून भाजपा १४६, शिवसेना १२४ तर मित्रपक्षांना १८ जागा देण्यात आल्या. मित्रपक्षांना देण्यात आलेल्या १८ पैकी ६ जागा आरपीआयच्या वाट्याला आल्या होत्या. आरपीआयकडून मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांना मानखुर्द शिवाजी नगर, तर उपाध्यक्ष दिपक निकाळजे यांना फलटणमधून उमेदवारी देण्यात आली होती. दिपक निकाळजे यांना चेंबूरमधून उमेदवारी हवी असल्याने त्यांनी फलटणमधून लढण्यास नकार दिला. तर गौतम सोनावणे यांना दिलेल्या मानखुर्द शिवाजी नगर मतदार संघातून शिवसेनेने विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी जाहीर केली. गौतम सोनावणे यांना भाजपाने एबी फॉर्म देण्यास नकार दिल्याने त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. यामुळे, आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

हेही वाचा - काँग्रेसचं सध्या चाललयं काय? बाळासाहेब थोरात यांची अनकट मुलाखत

आरपीआयच्या मानखुर्द शिवाजी नगरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. तसेच, आरपीआयचे कार्यकर्ते लोकरे यांचा प्रचार करणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला असल्याचे मानखुर्द शिवाजी नगर तालुका अध्यक्ष चंद्रकांत न्यायनिर्गुणे यांनी सांगितले आहे. आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी शिवाजी नगर मतदार संघापुरती मर्यादित नसून महाराष्ट्रात सर्वत्र पोहचली आहे. गौतम सोनावणे यांना माघार घ्यायला लावणाऱ्या शिवसेनेच्या एकाही उमेदवाराचा प्रचार न करण्याचा घेण्यात आला असल्याची माहिती विद्यार्थी संघटनेचे चंद्रशेखर कांबळे यांनी दिली आहे.

Intro:मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील रिपाईच्या वाटेला आलेल्या जागांवर युतीमधील पक्षांनीच उमेदवार उभे केल्याने रिपाईच्या उमेदवारांना ऐनवेळी माघार घ्यावी लागली. या निवडणुकीत रिपाईच्या वाट्याला भोपळा आला आहे. यामुळे नाराज झालेल्या रिपाईच्या कार्यकर्त्यांनी महायुतीमधील शिवसेनेचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज असताना आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मात्र युतीच्या प्रचारात उपस्थित राहत असल्याचे दिसत आहे. यामुळे महायुतीच्या उमेदवारांना याचा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. Body:येत्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा, शिवसेना, आरपीआय आदी मित्र पक्षांची महायुती करण्यात आली आहे. महायुतीकडून भाजपा १४६, शिवसेना १२४ तर मित्रपक्षांना १८ जागा देण्यात आल्या. मित्रपक्षांना देण्यात आलेल्या १८ पैकी ६ जागा आरपीआयच्या वाट्याला आल्या. आरपीआयकडून मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांना मानखुर्द शिवाजी नगर, तर उपाध्यक्ष दिपक निकाळजे यांना फलटणला उमेदवारी देण्यात आली. दिपक निकाळजे यांना चेंबूरमधून उमेदवारी हवी असल्याने त्यांनी फलटणमधून लढण्यास नकार दिला. तर गौतम सोनावणे यांना दिलेल्या मानखुर्द शिवाजी नगर मतदार संघातून शिवसेनेने विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी जाहीर केली. गौतम सोनावणे यांना भाजपाने एबी फॉर्म देण्यास नकार दिल्याने त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली.

दिपक निकाळजे व गौतम सोनावणे यांना भाजपा व शिवसेना या मित्रपक्षामुळे माघार घ्यावी लागल्याने लागल्याने आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आरपीआयच्या मानखुर्द शिवाजी नगरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. आरपीआयचे कार्यकर्ते शिवाजी नगर मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांचा प्रचार करणार नाही असा निर्णय घेण्यात आला असल्याचे मानखुर्द शिवाजी नगर तालुका अध्यक्ष चंद्रकांत न्यायनिर्गुणे यांनी सांगितले. आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी शिवाजी नगर मतदार संघापुरती मर्यादित नसून मुंबई महाराष्ट्रापर्यंत पोहचली आहे. गौतम सोनावणे यांना माघार घ्यायला लावणाऱ्या शिवसेनेच्या एकाही उमेदवाराचा प्रचार न करण्याचा घेण्यात आला असल्याची माहिती विद्यार्थी संघटनेचे चंद्रशेखर कांबळे यांनी दिली आहे. जर कोणी आरपीआयचे कार्यकर्ते महायुतीचा प्रचार करत असतील तर ते लाचार असतील असे आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

महायुतीच्या उमेदवाराना फटका -
एकिकडे आरपीआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असताना पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हे भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. उमेदवारांच्या कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. यामुळे पक्षाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये एकसूत्रता नसल्याचे दिसत आहे. महायुतीकडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचा प्रचार आरपीआयचे कार्यकर्ते व पदाधिकारी करत नसल्याने याचा फटका महायुतीमधील उमेदवाराना नक्कीच बसणार आहे.

बातमीसाठी
मानखुर्द शिवाजी नगर तालुका अध्यक्ष चंद्रकांत न्यायनिर्गुणे व
विद्यार्थी संघटनेचे नेते चंद्रशेखर कांबळे
यांच्या बाइटस Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.