ETV Bharat / state

RPF Jawan Save life: रेल्वेतून पडलेल्या महिलेला आरपीएफ जवानाने वाचवले

मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावर 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 वाजून 58 मिनिटांनी महिला दहिसरहून विरारला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी जात होती. मात्र ट्रेन धावल्यामुळे महिलेचा पाय रुळ आणि ट्रेनच्या मध्ये आला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या आरपीएफ अधिकाऱ्याने महिलेला तातडीने बाहेर काढले. त्यामुळे महिलेचा जीव वाचला. ही संपूर्ण घटना थेट सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आरपीएफ जवानाने महिलेला ट्रेनखाली जाण्यापासून कसे वाचवले ते तुम्ही पाहू शकता.

CCTV Footage
महिलेला आरपीएफ जवानाने वाचवले
author img

By

Published : Feb 25, 2023, 9:22 AM IST

महिलेला आरपीएफ जवानाने वाचवले

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकल ट्रेनमधून पडून एका वर्षात एकूण 2507 जणांचा मृत्यू झाला आहे.तर रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात मध्य आणि पश्चिम मार्गासह रेल्वेतून पडून 700 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

अपघातांमागे प्रवाशांचा निष्काळजीपणा: इतरांमध्ये रेल्वे रूळ ओलांडताना किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना खांबाला आदळल्याने मृत्यू झालेल्यांचा समावेश आहे.रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या सर्व प्रयत्नांना न जुमानता, रेल्वेशी संबंधित अपघातात प्रवाशांना ज्या पद्धतीने जीव गमवावा लागत आहे, तो चिंतेचा विषय आहे. वाढत्या रेल्वे अपघातांमागे प्रवाशांचा निष्काळजीपणा असल्याचे बोलले जात आहे. स्टेशन परिसरात किंवा ट्रेनच्या आत रेल्वेने केलेल्या घोषणांकडे प्रवासी अनेकदा दुर्लक्ष करतात.

सर्वाधिक मृत्यू हे ट्रेनमधून पडल्यामुळे: पश्चिम मार्ग - पश्चिम रेल्वेवर रेषा रेषा ओलांडल्यामुळे 39 महिलांचा मृत्यू तर 425 पुरुषाचा झाला आहे. तसेच मृत्यूची कमाल संख्या ही बोरिवली मध्ये 140, वसईत 113 आहे. दुसरे म्हणजे ट्रेनमधून पडून मृत्यू झालेल्या महिला 21 आहेत. पुरुष 169 आहेत.तर सर्वाधिक मृत्यू हे ट्रेनमधून पडल्यामुळे झाले आहे. बोरिवली मध्ये 40 तर, वसईत 67 लोक मृत्यू झाले आहेत.

अपघातात पाय गमवावा लागला: 6 डिसेंबर रोजी मुंबईतील माहीम परिसरात राहणारा 10 वर्षीय फरहान अन्सारी नमाज अदा करण्यासाठी माहीमहून वांद्र्याच्या दिशेने त्याच्या 2-3 मित्रांसह गेला होता. दरम्यान, ट्रेनमध्ये प्रवास करत असताना फरहान अचानक ट्रेनमधून खाली पडला. या अपघातात फरहानला त्याचा एक पाय गमवावा लागला, मात्र वेळीच वांद्रे स्थानकावर उपस्थित असलेले जीआरपी पोलीस कॉन्स्टेबल चेतन तातू यांनी शौर्य दाखवत फरहानला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या फरहानवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तरुण ट्रेनमधून पडल्याची घटना: या आधीही बेलापूर कल्याण रेल्वे स्थानकाच्या ४ नंबर फलाटावर चालत्या ट्रेनमधून पडलेल्या महिलेला एका आरपीएफ जवानाने रेल्वे खाली जाण्यापासून वाचवले होते. त्यापाठोपाठ आणखी एक घटना घडली होती. चालत्या ट्रेनमधून लगेज देण्याच्या नादात काकांना सोडण्यासाठी आलेला तरुण ट्रेनमधून पडल्याची घटना समोर आली आहे.कल्याण रेल्वे स्थानकावर गावी जाण्यासाठी रमाशंकर हा त्याचे काका चंद्रपाल सतइपाल यांना सोडण्यासाठी आला होता. त्यावेळी ४ नंबर फलाटावर गोदान एक्स्प्रेस आली असता, चंद्रपाल सतइपाल हे गोदान एक्स्प्रेस चढले. मात्र, त्यांची बॅग खालीच राहिली. तर तितक्यातच ट्रेन स्थानकातून सुटली. त्यामुळे रमाशंकर काकाची बॅग देण्याच्या नादात तो चालत्या ट्रेनमध्ये चढला. बॅग वजनदार असल्याने त्याचा तोल जाऊन तो चालत्या ट्रेनमधून खाली पडला होता.

हेही वाचा: CCTV आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे वाचले प्राण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.