मुंबई - सुशांतसिंह मृत्यू मृत्यूप्रकरणी सीबीआयकडून सलग चार दिवस रिया चक्रवर्तीची चौकशी केल्यानंतर पाचव्या दिवशीही तिची चौकशी होणार असे सांगितले जात होते. मात्र रिया चक्रवर्तीचे वकील अॅड. सतीश माने शिंदे यांनी या गोष्टीचे खंडन केलेले आहे. मात्र सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता रिया चक्रवतीची आई आणि वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांना सीबीआयने समन्स दिला असून ते दोघेही सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर झाले आहे.
सीबीआयच्या पथकासमोर सोमवारी रिया चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठाणी, शोविक चक्रवर्ती, यांच्यासह नीरज व कर्मचारी केशव यांची पुन्हा चौकशी करण्यात आली होती. काल रियाची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली व त्यानंतर तिला घरी जाऊ देण्यात आले होते. याबरोबरच सुशांतसिंहची बहीण मीतूसिंहला सुद्धा सीबीआयकडून समन्स बजाविण्यात आलेला आहे. मात्र, अद्याप सीबीआय समोर चौकशीसाठी ती हजर झालेली नाही. तसेच, मंगळवारी पुन्हा एकदा रिया चक्रवर्ती पुन्हा चौकशीसाठी हजर होणार असे सांगितले जात होते. मात्र आता तिच्या वकीलांनी ती येणार नसल्याचे सांगितले आहे.