मुंबई- भांडणाचा राग मनात ठेवून दुचाकीस्वाराला जोरात धडक देऊन रिक्षाचालकाने पळ काढल्याची घटना १७ डिसेंबरला घाटकोपर मानखुर्द लिंक येथे ईस्टर्न फ्रीवे ब्रिज खाली घडली होती. त्या मुजोर रिक्षाचालकाला देवनार पोलिसांनी अटक केली आहे.
जाब विचारल्याचा रागात कृत्य
मार्क्सवादी पक्षाचे मुंबईचे सचिव किशोर काशिनाथ कर्डक (42वर्ष) हे सिग्नलला उभे होते. तेव्हा मागून येणाऱ्या एका रिक्षाचालकाने त्यांच्या पायावरुन रिक्षा नेली. यावर किशोर यांनी त्या रिक्षाचालकास जाब विचारला असता त्याने वेडीवाकडी रिक्षा चालवत किशोर यांच्या गाडीला जोरात धडक दिली. धडकेनंतर किशोर जोरात खाली पडले. मात्र, त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी त्या मुजोर रिक्षाचलकाने तिथून पळ काढला. यां संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सिसिटीव्हीत कैद झाला असून सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रिक्षाचालकावर गुन्हा दाखल
सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे देवनार पोलिसांनी त्या मुजोर रिक्षाचालकाचा शोध घेतला आणि त्याला अटक केली असून 336,307,279 आणि मोटर वाहन कलम 184(अ )(ब ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- 'त्या' संशयिताचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, पण स्ट्रेनचा अहवाल प्रतीक्षेत
हेही वाचा- रजनीकांत हैदराबादच्या अपोलोमध्ये भरती, रुग्णालयाचा खुलासा