मुंबई Rickshaw Driver Murder: नफीस शराफत खान उर्फ कक्की (वय 36), मुकेश श्यामनारायण पाल (वय २५) आणि मोहम्मद साकीर सेद उर्फ जस्तीन (वय २३) अशी अटक आरोपींची नावे आहेत. (extramarital affair) मुख्य आरोपी नफीस खान याचा रिक्षा भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. तर मुकेश श्यामनारायण पाल आणि मोहम्मद साकीर सेद उर्फ जस्तीन हे रिक्षाचालक असून तिघेही गोवंडीतील बैंगणवाडी या परिसरात राहणारे आहेत. या तिघांना काल रात्री गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ने अटक केली आहे. (killers arrested)
कट रचून केला खून: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत इसमाचे नाव अमन शेख (वय २३) असून अमनसह साकीर आणि मुकेश हे नफीसकडून रिक्षा चालवण्यासाठी घेत. दरम्यान रिक्षा परत देण्यासाठी नसिफच्या घरी नेहमी जात असे. त्यावेळी नसिफच्या पत्नीसोबत अमन गप्पा मारत असे. त्यावरून नसिफ याला आपल्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याबाबत अमनवर संशय होता. या संशयावरून अमनला ५ जानेवारीला मध्यरात्री जीवे मारले आणि मृतदेह मिठी नदीत फेकून दिला. झाले असे की, ५ जानेवारीला नेहमीप्रमाणे अमन रिक्षा देण्यासाठी नफीसकडे गेला असताना त्याला नफीसने विवाहबाह्य संबंधावरून जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी नफीसने मुकेश पाल आणि साकिर यांना रात्री आपल्या गोवंडीतील घरी बोलावून घेतले आणि अमनशी वाद घालून मध्यरात्री त्याची हत्या केली आणि मृतदेह मिठी नदीत तिघांनी फेकून दिला, असल्याची आरोपींनी पोलिसांना कबुली दिली आहे.
२०० हून अधिक मिसिंग केसेसची तपासणी: मिठी नदीत सापडलेल्या मृतदेहाची उकल करण्यासाठी कक्ष ५ ने मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यातील २०० हून अधिक मिसिंग केसेस पडताळून पाहिल्या. त्यावेळी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात एका पुरुषाची मिसिंग केस आढळून आली. अमनच्या बहिणीने ही मिसिंग तक्रार दाखल केल्यानंतर मिठी नदीत सापडलेल्या अमनच्या मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुख्य आरोपी असलेल्या नसिफने अमनच्या घरी जाऊन तुझा भाऊ माझी रिक्षा घेऊन १५ दिवस झाले आला नसल्याची तक्रार केली. त्यावर अमनच्या बहिणीच्या नवऱ्याने गोवंडीतील पार्किंगमध्ये उभी असलेली रिक्षा शोधून काढली. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तिन्ही आरोपींना कक्ष ५च्या आरोपींनी अटक केली असल्याची माहिती कक्ष ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांनी दिली आहे.
हेही वाचा: