ETV Bharat / state

रणधुमाळी लोकसभेची : उत्तर-मध्य मुंबईचा गड काँग्रेस पुन्हा खेचून आणणार का?

author img

By

Published : Apr 24, 2019, 11:42 AM IST

Updated : Apr 24, 2019, 3:29 PM IST

या मतदारसंघात खरी लढत ही या दोघींमध्येच असली तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहेमान अंजरिया यांचे मोठे आव्हान उभे टाकले आहे. दलित, मुस्लिम, धनगर आदी समाजाची मते मोठ्या प्रमाणात अंजरिया मिळवू शकतात. त्यांनीही कुर्ला, वांद्रे, चांदीवली, कलिना या परीसरात मुस्लिम संघटना, भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीतील घटक पक्षांनी प्रचारात उडी मारून काँग्रेस-भाजप या दोन्हीही पक्षाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत.

पुनम महाजन आणि प्रिया दत्त

मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील एकूण ४८ जागांसाठी मतदान प्रक्रिया ही ४ टप्प्यात पार पडणार असून त्यापैकी ३ टप्पे पूर्ण झाले आहेत. आता चौथ्या टप्प्यात मुंबईसह उर्वरीत एकूण १७ मतदारसंघांसाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने मुंबईत असलेल्या सहा लोकसभा मतदारसंघातील मुंबई उत्तर-मध्य या मतदारसंघाचा घेतलेला विश्लेषणात्मक आढावा...

उत्तर-मध्य मुंबईचा गड काँग्रेस पुन्हा खेचून आणणार का?

मुंबईत असलेल्या सहा लोकसभा मतदारसंघात मुंबई उत्तर-मध्य हा लोकसभा मतदारसंघ तसा काँग्रेसचा गड मानला जात होता. याच मतदारसंघातून आतापर्यंत चार वेळा काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. शिवसेनेचे मनोहर जोशी यांना लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचवण्यासाठी हाच मतदारसंघ महत्वाचा ठरला. त्यापूर्वी सेनेचे नारायण आठवले, विद्याधर गोखले हेही याच मतदार संघातून निवडून आले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमध्ये पूनम महाजन यांनी मुंबई उत्तर-मध्यचा हा काँग्रेसचा गड प्रिया दत्त यांच्याकडून हिरावून घेतला होता. आता लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपकडून पूनम महाजन आणि काँग्रेसकडून प्रिया दत्त या आमने-सामने उभ्या आहेत.

प्रिया-पूनम यांच्यातच लढत, मात्र वंचितचेही आव्हान -

पक्षीय बलाबल-

या मतदारसंघात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम आणि कलिना विधानसभा असेच सहा मतदारसंघ येतात. या सहा मतदारसंघात शिवसेनेचे तीन आणि भाजपचे दोन आमदार आहेत. तर काँग्रेसचा एकच आमदार चांदिवली विधानसभा मतदारसंघातून आहे.

विधानसभा मतदारसंघ – आमदार

  • विले-पार्ले – पराग अळवणी, भाजप
  • चांदिवली – नसीम खान, काँग्रेस
  • कुर्ला (अ.जा) - मंगेश कुडाळकर, शिवसेना
  • कलिना – संजय पोतनीस, शिवसेना
  • वांद्रे पूर्व – प्रकाश(बाळा) सावंत, शिवसेना
  • वांद्रे पश्चिम – आशिष शेलार, भाजप

मतदारसंघातील जाती-धर्माचे प्राबल्य-

या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतांची संख्या सर्वाधिक आहे. तर दुसरीकडे विलेपार्ले वांद्रे पश्चिम, कलिना या विधानसभा मतदारसंघात मराठी आणि इतर संमिश्र मतदार आहेत. कुर्ला विधानसभा मतदारसंघ हा मुस्लीमबहुल आणि दुसरीकडे काही प्रमाणात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, संघ आदी संघटनाचे प्राबल्य असेलला आहे. बैलबाजार या परिसरात याचा मोठा प्रभाव असल्याने ही हमखास मते आपल्याला मिळतील यासाठी पूनम महाजन यांनी या परिसरात प्रचारसभावसोबत धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेत मत देण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे प्रिया दत्तही मागे राहिल्या नाहीत. ज्या ज्या ठिकाणी मुस्लीम, दलित आणि कष्टकरी, कामगार यांच्या वस्त्या आहेत, त्या वस्त्यांमध्ये जाऊन त्या प्रचार करत आहेत.

प्रिया दत्त - प्रचार मुद्दे आणि जनमत

प्रिया दत्त यांच्या प्रचारात विकासाचा मुद्दा समोर आणला जातोय, तर स्थानिक प्रश्नही कसे अर्धवट राहिलेले आहेत हे मतदार समोर येऊन सांगत आहेत. चांदीवली, कुर्ला जरीमरी परिसरात असलेल्या झोपडपट्टी परिसरात सार्वजनिक सोयी मिळत नसल्याने मतदार त्रस्त झाले आहेत. आपल्या खासदारांचे नाव माहीत नसल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी दिल्या. तर अनेकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना संतापही व्यक्त केला.

वांद्रे पश्चिम आणि वांद्रे पूर्व या दोन्हीही मतदार संघातील प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. वांद्रे पूर्वेला सरकारी वसाहती, जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न मोठा आहे. तर वाहतूक कोंडीने स्टेशन परीसर कायम चर्चेत असतो. विलेपार्ले या विभागात मराठी मते मिळवण्यासाठी काँग्रेसला बरीच मेहनत करावी लागणार आहे. चांदीवली, कुर्ल्यातील मतदार मात्र काँग्रेसच्या बाजूने उभे राहील असे चित्र यादरम्यान दिसते.

पूनम महाजन - प्रचार मुद्दे आणि जनमत-

मोदी लाटेमध्ये जिंकून आलेल्या पूनम महाजन यांच्याबद्दल मतदारसंघात मोठी नाराजी आहे. विशेषतः विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम आणि चांदीवली परिसरात पूनम महाजनच्या विरोधात जनमानस तयार झाल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे पूनम महाजन यांनी मागील काही महिन्यात कुर्ला, वांद्रे या परिसरातील स्थानिकांच्या घरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठा पुढाकार घेतल्याने त्यांच्याबद्दलची भावना जनमानसात तयार झाल्याचे सांगितले जाते. तरीही ही मागील पाच वर्षात मुंबई उत्तर-मध्य या लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन यांनी म्हणावा तशी विकास कामे केली नसल्याचा ठपका स्थानिक जनतेकडून ठेवला जातो. खैरानी रोड, जरीमरी, साकीनाका आदी पट्ट्यात मोठ्या प्रमाणात लघु उद्योजक आहेत. नोटबंदीने आणि त्यानंतर आलेल्या जीएसटीने अनेकजण हैराण झाले असल्याने त्यांना प्रिया दत्त यांचा आधार वाटतोय. तर विमानतळ परिसरातील घरांच्या पुनर्विकासाचे प्रश्न हे पूनम महाजन सोडवतील, असा विश्वास असणाऱ्या मतदारांची बरीच मोठी संख्या आहे तर विरोध करणारेही तितकेच आहेत.

राजकीय बलस्थाने आणि उणिवा-
मागील विधानसभा निवडणुकीत याच लोकसभा मतदारसंघात चांदीवलीचा अपवाद वगळता काँग्रेसला मोठा फटका पडला होता. त्याची भरपाई करण्यासाठी काँग्रेसचे अनेक नेते या मतदारसंघात प्रचाराला उतरत आहेत. अद्यापही काँग्रेसकडून आतापर्यंत चांदीवलीचे आमदार नसीम खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, आदींचा अपवाद सोडला तर इतर मोठे नेते अजून मैदानात उतरलेले नाहीत.

प्रिया दत्त यांचा म्हणावा तसा प्रचार सुरू झाला नसला तरी भाजपने मात्र घराघरात जाऊन प्रचार सुरू ठेवला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांनी यासाठी खास जबाबदारी घेतली असली तरी पूनम महाजन यांना शिवसेनेच्या स्थानिक आमदार आणि नगरसेवकावर खुप अवलंबून राहावे लागत आहे. वांद्रे, कलिना, विलेपार्ले परिसरात शिवसेनेच्या शाखांचा मोठा आधार पूनम महाजन यांना मिळत असला तरी मोदींच्या निर्णयाने नाराज असलेले असंख्य शिवसैनिक मतदानातून आपला राग व्यक्त करू शकतात असेही या ठिकाणी चित्र दिसत आहे.

दत्त यांच्या बद्दल आपुलकीची भावना-

मागील लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांना वांद्रे पश्चिम विलेपार्ले, वांद्रे पूर्व, कलिना या भागातून मोठी मते मिळाली होती. त्याच मतावर त्या विजयी झाल्या होत्या. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रिया दत्त यांना पराभव स्वीकारवा लागला होता. यावेळच्या निवडणुकीत नेमके चित्र काय असेल, याविषयी जनमानसात उत्सुकता निर्माण झालेली असली तरी प्रिया दत्त यांच्याबद्दल ही पारंपरिक मतदारांमध्ये मोठी आपुलकीची भावना असल्याचे सांगितले जाते.

प्रिया दत्त आणि पूनम महाजन या दोन्ही लोकसभा उमेदवारांना एक राजकीय परंपरा आहे. पूनम महाजन या भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या असून त्यामुळे त्यांच्या मागे भाजपचे एक मोठे वलय आहे. तर प्रिया दत्त यांना सुद्धा काँग्रेसची एक मोठी परंपरा आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सुनील दत्त यांच्या त्या कन्या असून दत्त हा परिवार मागील अनेक दशकांपासून काँग्रेस सोबत राहिला आहे. त्यामुळेच यावेळीही काँग्रेसने स्थानिक कार्यकर्त्यांच्या या मताला डावलून पुन्हा एकदा प्रिया दत्त यांना संधी दिली आहे. इतकेच नाही तर प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी शेवटच्या टप्प्यात काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते मैदानात उतरणार आहेत, तरीही या मतदारसंघातून नेमके के चित्र काय असेल हे मात्र निकाल समोर आल्यावरच स्पष्ट होणार आहे.

२०१४मधील आकडेवारी

  • पूनम महाजन – भाजप – ४ लाख ७८ हजार ५३५
  • प्रिया दत्त – काँग्रेस – २ लाख ९१ हजार ७६४
  • फिरोझ पालखीवाला – आप – ३४ हजार ८२४
  • नोटा – ६ हजार ९३७

Intro:
आढावा

Body:मुंबई उत्तर-मध्य मधून काँग्रेस आपला गड पुन्हा राखणार का?

(आढावा)

(यासाठी वेब मोजोवर ptc सह 8 व्हीज्वल पाठवले आहेत, उर्वरित व्हीज्वल, बाईट जोडत आहे

मुंबई, ता.

मुंबईत असलेल्या सहा लोकसभा मतदारसंघात मुंबई उत्तर-मध्य हा लोकसभा मतदारसंघ तसा काँग्रेसचा गड मानला जात होता
याच मतदारसंघातून आतापर्यंत चार वेळा काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. शिवसेनेचे मनोहर जोशी यांना लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत पोचवण्यासाठी हाच मतदारसंघ महत्वाचा ठरला. त्यापूर्वी सेनेचे नारायण आठवले, विद्याधर गोखले हेही याच मतदार संघातून निवडून आले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमध्ये पूनम महाजन यांनी मुंबई उत्तर-मध्यचा हा काँग्रेसचा गड प्रिया दत्त यांच्याकडून हिसकावून घेतला होता. आता लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाकडून पूनम महाजन आणि काँग्रेसकडून प्रिया दत्त या आमने-सामने उभ्या आहेत.
या मतदारसंघात खरी लढत ही या दोघींमध्येच असली तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहेमान अंजरिया यांचे मोठे आव्हान उभे टाकले आहे. दलित, मुस्लिम, धनगर आदी समाजाची मते मोठ्या प्रमाणात अंजरिया मिळवू शकतात. त्यांनीही कुर्ला, वांद्रे, चांदीवली, कलिना या परीसरात मुस्लिम संघटना, भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीतील घटक पक्षांनी प्रचारात उडी मारून काँग्रेस-भाजप या दोन्हीही पक्षाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत.

या मतदारसंघात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम आणि कलिना विधानसभा असेच सहा मतदारसंघ येतात. या सहा मतदारसंघात शिवसेनेचे तीन आणि भाजपाचे दोन आमदार आहेत तर एकच आमदार चांदिवली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतांची संख्या सर्वाधिक आहे. तर दुसरीकडे विलेपार्ले वांद्रे पश्चिम, कलिना या विधानसभा मतदार संघात मराठी आणि इतर संमिश्र मतदार आहेत. कुर्ला विधानसभा मतदारसंघ हा मुस्लीमबहुल आणि दुसरीकडे काही प्रमाणात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, संघ आदी संघटनाचे प्राबल्य असेलला आहे. बैलबाजार या परिसरात याचा मोठा प्रभाव असल्याने ही हमखास मते आपल्याला मिळतील यासाठी पूनम महाजन यांनी या परिसरात प्रचारसभावसोबत धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेत मते मागण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे प्रिया दत्तही मागे राहिल्या नाहीत.ज्या ज्या ठिकाणी मुस्लीम, दलित आणि कष्टकरी , कामगार यांच्या वस्त्या आहेत, त्या वस्त्यांमध्ये जाऊन त्या प्रचार करत आहेत. प्रिया दत्त यांच्या प्रचारात विकासाचा मुद्दा समोर आणला जातोय, तर स्थानिक प्रश्नही कसे अर्धवट राहिलेले आहेत हे मतदार समोर येऊन सांगत आहेत. चांदीवली, कुर्ला जरीमरी परिसरात असलेल्या झोपडपट्टी परिसरात सार्वजनिक सोयी मिळत नसल्याने मतदार त्रस्त झाले आहेत.आपल्या खासदारांचे नाव माहीत नसल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी दिल्या. तर अनेकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना संतापही व्यक्त केला.
वांद्रे पश्चिम आणि वांद्रे पूर्व या दोन्हीही मतदार संघातील प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे आहेत.वांद्रे पूर्वेला सरकारी वसाहती, जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न मोठा आहे. तर वाहतूक कोंडीने स्टेशन परीसर कायम चर्चेत असतो. विलेपार्ले या विभागात मराठी मते मिळवण्यासाठी काँग्रेसला बरीच मेहनत करावी लागणार आहे.चांदीवली, कुर्ल्यातील मतदार मात्र काँग्रेसच्या बाजूने उभे राहील असे चित्र यादरम्यान दिसते.

मोदी लाटेमध्ये जिंकून आलेल्या पूनम महाजन यांच्याबद्दल मतदारसंघात मोठी नाराजी आहे. विशेषतः विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम आणि चांदीवली परिसरात पूनम महाजनच्या विरोधात जनमानस तयार झाल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे पूनम महाजन यांनी मागील काही महिन्यात कुर्ला, वांद्रे या परिसरातील स्थानिकांच्या घरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठा पुढाकार घेतल्याने त्यांच्याबद्दलची भावना जनमानसात तयार झाल्याचे सांगितले जाते. तरीही ही मागील पाच वर्षात मुंबई उत्तर-मध्य या लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन यांनी म्हणावा तशी विकास कामे केली नसल्याचा ठपका स्थानिक जनतेकडून ठेवला जातो. खैरानी रोड, जरीमरी, साकीनाका आदी पट्ट्यात मोठ्या प्रमाणात लघु उद्योजक आहेत. नोटबंदीने आणि त्यानंतर आलेल्या जीएसटीने अनेकजण हैराण झाले असल्याने त्यांना प्रिया दत्त यांचा आधार वाटतोय. तर विमानतळ परिसरातील घरांच्या पुनर्विकासाचे प्रश्न हे पूनम महाजन सोडवतील असा विश्वास असणाऱ्या मतदारांची बरीच मोठी संख्या आहे तर विरोध करणारेही तितकेच आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत याच लोकसभा मतदारसंघात चांदीवलीचा अपवाद वगळता काँग्रेसला मोठा फटका पडला होता. त्याची भरपाई करण्यासाठी काँग्रेसचे अनेक नेते या मतदारसंघात प्रचाराला उतरत आहेत. अद्यापही काँग्रेसकडून आतापर्यंत चांदीवलीचे आमदार नसीम खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, आदींचा अपवाद सोडला तर इतर मोठे नेते अजून मैदानात उतरलेले नाहीत, प्रिया दत्त म्हणावा तसा प्रचार सुरू झाला नसला तरी भाजपाने मात्र घराघरात जाऊन प्रचार सुरू ठेवला आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष ऍड.आशिष शेलार यांनी यासाठी खास जबाबदारी घेतली असली तरी पूनम महाजन यांना शिवसेनेच्या स्थानिक आमदार आणि नगरसेवकावर खुप अवलंबून राहावे लागत आहे. वांद्रे, कलिना, विलेपार्ले परिसरात शिवसेनेच्या शाखांचा मोठा आधार पूनम महाजन यांना मिळत असला तरी मोदींच्या निर्णयाने नाराज असलेले असंख्य शिवसैनिक मतदानातून आपला राग व्यक्त करू शकतात असेही या ठिकाणी चित्र दिसत आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांना वांद्रे पश्चिम विलेपार्ले, वांद्रे पूर्व, कलिना या भागातून मोठी मते मिळाली होती. त्याच मतावर त्या विजयी झाल्या होत्या. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रिया दत्त यांना पराभव स्वीकारवा लागला होता. यावेळच्या निवडणुकीत नेमके चित्र काय असेल, याविषयी जनमानसात उत्सुकता निर्माण झालेली असली तरी प्रिया दत्त यांच्याबद्दल ही पारंपारिक मतदारांमध्ये मोठी आपुलकीची भावना असल्याचे सांगितले जाते.
प्रिया दत्त आणि पूनम महाजन या दोन्ही लोकसभा उमेदवारांना एक राजकीय परंपरा आहे. पूनम महाजन ह्या भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या असून त्यामुळे त्यांच्या मागे भाजपाचे एक मोठे वलय आहे. तर प्रिया दत्त यांना सुद्धा काँग्रेसची एक मोठी परंपरा आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सुनील दत्त यांच्या त्या कन्या असून दत्त हा परिवार मागील अनेक दशकांपासून काँग्रेस सोबत राहिला आहे. त्यामुळेच यावेळीही काँग्रेसने स्थानिक कार्यकर्त्यांच्या या मताला डावलून पुन्हा एकदा प्रिया दत्त यांना संधी दिली आहे. इतकेच नाही तर प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी शेवटच्या टप्प्यात काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते मैदानात उतरणार आहेत तरीही या मतदारसंघातून नेमके के चित्र काय असेल हे मात्र निकाल समोर आल्यावरच स्पष्ट होणार आहे.

Conclusion:आढावा
Last Updated : Apr 24, 2019, 3:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.