ETV Bharat / state

घाटकोपर पूर्व विधानसभा आढवा: भाजप गड राखणार का ?

मतदारसंघात मराठी-गुजराती हा सुप्त वाद होता. परंतु, मराठीचा मुद्दा केव्हाच मागे पडला आहे. मराठी भाषिकही भाजपला पाठींबा देत आहेत. मतदारसंघातील आमदार मेहता यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डच्चू देत काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे-पाटलांकडे गृहनिर्माण खाते सोपवले आहे.

घाटकोपर पूर्व विधानसभा
author img

By

Published : Sep 16, 2019, 7:27 PM IST

मुंबई - गुजराती मतदारांचे प्राबल्य असणारा घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मागील 6 टर्म माजी मंत्री प्रकाश महेता निर्विवादपणे निवडून येत आहेत. या ठिकाणी अन्य राजकीय पक्षांचे अस्तित्व असले तरी भाजपसमोर कोण? असा प्रश्न नेहमीच निर्माण होत आहे. या मतदारसंघात दलित मतदारांची एकगठ्ठा मते असली तरी त्याचे नेहमीच विभाजन होत आले आहे.

घाटकोपर पूर्व विधानसभा आढवा

हेही वाचा - विधानसभा 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं; प्रत्येकी 125 जागा लढवणार

शिवसेना, मनसे या पक्षांचे अस्तित्व येथे आहे. मात्र, युतीमध्ये ही जागा भाजपसाठी दिली जाते. 2014 साली शिवसेनेने वेगळे लढूनही या मतरसंघावर भगवा फडकवता आला नव्हता. तर मनसेलाही मराठी मतदारांवर विशेष प्रभाव आतापर्यंत पाडता आलेला नाही. त्यामुळे भाजपला मिळणारे गुजराती एकगठ्ठा मतदान आणि मराठी भाषिकांसह इतरांचा पाठिंबा मोडून काढणे, हे विरोधकांसमोर मुख्य आव्हान असणार आहे.

भौगोलिक स्तिथी -

घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रात मोठा भाग इमारतींनी व्यापला आहे. जवळपास 30 टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. बहुतांश भागात पुनर्विकासाची कामे सुरू आहेत.

मतदारसंघात मराठी-गुजराती हा सुप्त वाद होता. परंतु, मराठीचा मुद्दा केव्हाच मागे पडला आहे. मराठी भाषिकही भाजपला पाठींबा देत आहेत. मतदारसंघातील आमदार मेहता यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डच्चू देत काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे-पाटलांकडे गृहनिर्माण खाते सोपवले आहे. महेतांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांच्याकडून गृहनिर्माण खाते काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे मेहतांना उमेदवारी मिळणार नसल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यामुळे स्वतःसाठी किंवा कुटुंबामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मेहतांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

हेही वाचा - सरकारला जनतेच्या त्रासाची जाणीव आहे - आदित्य ठाकरे

मतदारसंघात विरोधक प्रबळ नसल्याने मेहता यांची लढाई ही स्वतःच्या पक्षातील लोकांशी असणार आहे. मेहता यांचे कट्टर राजकीय विरोधक समजले जाणारे प्रविण छेडा यांना भाजपने प्रवेश दिला आहे. त्यामुळे प्रविण छेडा यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

काय असतील राजकीय समीकरण -

काँग्रेसकडून राजा मिराणी, विरेंद्र बक्षी आणि अशोक भानुशाली यांच्या नावांची चर्चा आहे. वीरेंद्र बक्षी यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जर घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रातून लढला तर ती औपचारिकता असेल. भाजप आणि शिवसेनेची युती न झाल्यास शिवसेनेकडून परमेश्वर कदम यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळू शकते.

भारतीय जनता पक्षाकडून प्रकाश मेहता, काँग्रेसमधून भाजपत आलेले प्रवीण छेडा आणि मुंबई महानगरपालिकेतले सर्वात श्रीमंत नगरसेवक पराग शाह यांच्या नावांची चर्चा आहे. प्रकाश मेहता यांचा अनुभव आणि पक्षातील वरिष्ठांशी असलेले संबंध त्यांच्या पारड्यात पुन्हा विधानसभेचे तिकीट टाकू शकतात. परंतु, पक्षाला नवा चेहरा हवा असेल तर छेडा किंवा शाह यांना संधी मिळू शकेल. त्यामुळे या ठिकाणी भाजप गड राखणार की, इतर कोणाला मतदार कौल देणार हे आगामी विधानसभा निवडणुकीत समोर येईलच.

  • विधानसभा निवडणूक 2014 निकाल
  • मतदानाची टक्केवारी – 56.30 %
  1. प्रकाश मेहता, भाजप – 67,012
  2. जगदीश चौधरी, शिवसेना – 26,885
  3. प्रवीण छेडा, काँग्रेस – 21,303
  4. राखी जाधव, राष्ट्रवादी – 10,471
  5. सतीश नारकर, मनसे – 7696
  6. नोटा – 1850

Intro:मुंबई

गुजराती मतदारांचे प्राबल्य असणारा घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मागील 6 टर्म माजी मंत्री प्रकाश महेता निर्विवादपणे निवडून येत आहेत. या ठिकाणी अन्य राजकीय पक्षांचे अस्तित्व असले तरी भाजपसमोर कोण? असा प्रश्न नेहमीच निर्माण होत आहे. दलित मतदारांची एकगठ्ठा मते असली तरी त्याचे नेहमीच विभाजन होत आले आहे. शिवसेना मनसे या पक्षांचे अस्तित्व येथे असले तरी युतीत हा मतदारसंघ भाजपला सुटतो. 2014 साली शिवसेनेने वेगळे लढूनही विशेष फरक पडलेला नाही. मनसेचाही मराठी मतदारांवर विशेष प्रभाव नाही. भाजपाला गुजराती एकगठ्ठा मतदान आणि मराठी भाषकांसह इतरांचा पाठिंबा मोडून काढणे हेच विरोधकांसमोरील मुख्य आव्हान आहे.
Body:ही निवडणूक महेता यांच्यासाठी राजकीय अस्तित्व टिकवणारी ठरणार आहे. यंदा त्यांच्यासमोर उमेदवारी कायम ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. समजा महेता यांना उमेदवारी मिळाली नाही आणि भाजपने दुसरा उमेदवार दिला तरी त्या उमेदवरासमोर प्रबळ उमेदवार कोण हा प्रश्न नेहमीच चर्चेत राहील. फार पूर्वी या मतदार संघात मराठी-गुजराती हा सुप्त वाद होता. परंतु, मराठीचा मुद्दा केव्हाच मागे पडला आहे. मराठी भाषकही भाजपला पाठींबा देतात, अशी परिस्थिती आहे. समजा शिवसेना भाजपच्या विरोधात लढली तरी प्रबळ उमेदवार असण्याची शक्यता कमीच आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करत मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डच्चू देत कालपरवा काँग्रेसमधून भाजपात आलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे गृहनिर्माण खात्याच्या चाव्या सोपवल्या आणि महेता यांच्याकडून कारभार काढून घेतला. महेता यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यामुळेच त्यांच्याकडून हे खाते काढून घेतल्याची चर्चा आहे. त्यांना
उमेदवारी मिळणार नाही, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. आता महेता यांना स्वतःसाठी किंवा कुटुंबात उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. विरोधक प्रबळ नसल्याने महेता यांची लढाई ही स्वतःच्या पक्षातील लोकांशी असणार आहे. महेता यांचे कट्टर राजकीय विरोधक समजले जाणारे प्रविण छेडा यांना भाजपने प्रवेश दिला. महेतांचा एक तगडा विरोधक ही भाजपने आपल्या गळाला लावला. याबाबत विविध तर्क लावले जात आहेत. या मतदारसंघात गुजराती भाषिक मतदारांचे प्राबल्य आहे.

१९९० पासून महेता यांच्यावर सातत्याने भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. युती सरकारच्या दोन्ही सरकारमध्ये त्यांनी महत्वाची मंत्रीपदे भूषवली आहेत. मात्र सन 2014 ते 2019 हा काळ मात्र त्यांच्यासाठी वादग्रस्त ठरला. एसआरए प्रकल्प, इमारतीचा पुनर्विकास, नियमबाह्य दिली जाणारी परवानगी आणि त्यातील टक्केवारी याबाबत सातत्याने त्यांच्यावर आरोप होत राहिले. त्यामुळे मेहता नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहिले.

मेहता यांच्यावर झालेल्या आरोपांचा फायदा मात्र
मतदार संघातील विरोधकांना घेता आलेला
नाही. मेहता यांच्यावरील मुख्यमंत्र्यांची उघड
नाराजीमुळे छेडा आणि नगरसेवक पराग शाह हेही प्रबळ दावेदार आहेत. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला या मतदारसंघातून तब्बल ९० हजारांवर मतांची आघाडी मिळाली होती. या मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित असले, तरी भाजपसाठी ही हक्काची जागा आहे. या मतदारसंघात दलित मतदार मोठ्या संख्येनं आहे. वंचित आघाडी फेक्टर चालेल पण मत विजयापर्यत पोहचणे शक्य होणार नाही. उलट मतांची फाटाफूट होईल.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) प्रकाश मेहता, भाजप – ६७,०१२
२) जगदीश चौधरी, शिवसेना – २६,८८५
३) प्रवीण छेडा, काँग्रेस – २१,३०३
४) राखी जाधव, राष्ट्रवादी – १०,४७१
५) सतीश नारकर, मनसे – ७६९६

नोटा – १८५०

मतदानाची टक्केवारी – ५६.३० %

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.