ETV Bharat / state

शिवडी – वरळी कनेक्टरसंदर्भात मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक - आदित्य ठाकरे न्यूज

शिवडी – वरळी कनेक्टर हा मुंबईच्या दोन किनारपट्ट्यांना जोडणारा महत्वाचा रस्ता प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम जलदगतीने व्हावे यासाठी या प्रकल्प मार्गावरील लोकप्रतिनिधी आणि एमएमआरडीए, महापालिका अधिकारी यांच्यामध्ये बैठकांच्या माध्यमातून कामांचा आढावा घेण्यात येत आहे.

शिवडी – वरळी कनेक्टरसंदर्भात मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

author img

By

Published : Dec 12, 2020, 1:36 PM IST

मुंबई- राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवडी–वरळी कनेक्टरसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस आमदार अजय चौधरी, आमदार सदा सरवणकर, नगरसेविका श्रद्धा जाधव, सचिन पडवळ, समाधान सरवणकर, उर्मिला पांचाळ, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महापालिकेचे उपायुक्त विजय बालमवार, मुख्य अभियंता (रस्ते) दराडे आदी उपस्थित होते.

बैठकांच्या माध्यमातून वेळोवेळी कामांचा आढावा...

शिवडी – वरळी कनेक्टर हा मुंबईच्या दोन किनारपट्ट्यांना जोडणारा महत्वाचा रस्ता प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम जलदगतीने व्हावे यासाठी या प्रकल्प मार्गावरील लोकप्रतिनिधी आणि एमएमआरडीए, महापालिका अधिकारी यांच्यामध्ये बैठकांच्या माध्यमातून कामांचा आढावा घेण्यात येत आहे. आजच्या आढावा बैठकीत विशेषत: प्रकल्पामुळे बाधीत होणाऱ्या नागरिकांचे त्याच परिसरात कशा पद्धतीने पुनर्वसन करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. तर पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात येणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा- शरद पवारांचा ८० वा वाढदिवस : पंतप्रधान मोदींसह देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव

हेही वाचा- तस्करी केलेले मूल घेतले दत्तक, न्यायालयीन लढा देत पुन्हा मिळवला मुलाचा ताबा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.