मुंबई Economist Vishwas Utgi On Retail Inflation : सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची आणि दैनंदिन आयुष्याशी निगडीत बातमी समोर येत आहे. आधीच महागाईमुळं मेटाकुटीला आलेल्या सामान्य लोकांसाठी आता महागाईमुळं आणखी जगणं कठीण होणार असल्याची शक्यता आहे. कारण डिसेंबर महिन्यात महागाईने पुन्हा डोके वर काढलं आहे. तसेच डिसेंबर महिन्यातील महागाईबाबत आकडेवारी समोर आलीय.
डिसेंबर महिन्यात महागाईत वाढली : केंद्रीय मंत्रालयाकडून प्रत्येक महिन्याला महागाईचा दर जाहीर केला जातो. ऑक्टोबर महिन्यात महागाईचा दर 4.87 टक्के होता. तर नोव्हेंबर महिन्यात महागाईचा दर 5.5 टक्के होता आणि डिसेंबर महिन्यात महागाईचा दर 5.69 टक्के होता. त्यामुळं मागील चार महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यातील महागाईचा दर वाढला आहे. विशेष म्हणजे खाद्यपदार्थांच्या वाढत्या किंमतींमुळे किरकोळ महागाई दर डिसेंबर 2023 मध्ये 5.69 टक्क्यांनी वाढला आहे.
महागाई कमी झाल्याचा भाजपाचा दावा : देशात आगामी काळात लोकसभा निवडणुका होणार आहेत. तर राज्यात विधानसभा निवडणुका देखील होणार आहेत. या धरतीवर काही महिन्यांपूर्वी गॅस तसेच काही दैनंदिन जीवनावश्यक गोष्टींच्या किंमतीत घट करण्यात आली होती. म्हणजे याचे दर कमी करण्यात आले होते. एकिकडे निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपा महागाई कमी झाल्याचा दावा करत असताना, डिसेंबर महिन्यात महागाई वाढल्याचं चित्र आहे. त्यामुळं यावरुन भाजपावर टीकास्त्र डागलं जातय. तसेच भाजपाच्या काळात बेरोजगारी देखील वाढली आहे असं बोललं जातंय.
4 टक्क्यापेक्षा अधिक महागाई हा चिंतेचा विषय : डिसेंबर महिन्यात महागाईचा दर 5.69 टक्के इतका राहिलेला आहे. दरम्यान, या महागाईचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तुवर झालेला आहे. जसे अन्नधान्य, डाळी, चहा, मसाले आदीवर झाला आहे. पण आरबीआयने म्हटलंय की, जर आपल्या महागाईचा दर 4 टक्क्यापेक्षा अधिक असेल तर हा चिंतेषा विषय आहे. असं आरबीआयचं म्हणणं आहे. तसेच महागाईचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो, असं अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी म्हटलं आहे. तसेच महागाईबाबत भाजपा चुकीचा प्रचार करत असल्याची टीका देखील उटगी यांनी केलीय.
हेही वाचा -