ETV Bharat / state

प्रतीक्षा संपली.. उद्या दुपारी जाहीर होणार दहावीचा निकाल - दहावी बोर्ड परिक्षा निकाल

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या(बुधवार) दुपारी १ वाजता शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून १७ लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.

SSC Board
दहावी बोर्ड
author img

By

Published : Jul 28, 2020, 4:22 PM IST

Updated : Jul 28, 2020, 7:40 PM IST

मुंबई - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या(बुधवार) दुपारी १ वाजता शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी याबाबत माहिती दिली. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून १७ लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. कोरोनामुळे या परीक्षेचा निकाल रखडला होता. मात्र, आज मंडळाकडून यासंदर्भातील घोषणा करण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्याच दरम्यान ही परीक्षा संपण्याच्या मार्गावर होती. मात्र, तरीही भूगोलाचा पेपर कोरोनामुळे रद्द करावा लागला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या पेपर तपासणी प्रक्रियेवरही मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लागणारा दहावीचा निकाल यावर्षी तब्बल दीड महिन्याहून अधिक उशिराने जाहीर केला जात आहे. पेपर तपासणीवर कोरोनाचा मोठा परिणाम झाल्याने निकाल जाहीर करण्यास उशीर झाला असल्याचे भोसले यांनी सांगितले.

निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना सर्व विषय निहाय संपादित केलेले गुण उपलब्ध होणार असून त्यासाठीची प्रत प्रिंट आउटच्या माध्यमातून घेता येणार आहे. www.maharesult.nic.in या संकेत स्थळावर निकालाशिवाय निकालाबाबत इतर सांख्यिकीय माहिती मंडळाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर www.mahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना श्रेणी विषयांव्यतिरिक्त कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी करण्यासाठी अथवा उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागाकडे ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी शाळांच्या मार्फत अर्ज सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे. गुण पडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट जुलै तर छायाप्रतीसाठी १८ ऑगस्टपर्यंत http://verification.mh-ssc.ac.in या संकेत स्थळावर शाळांच्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता या संकेतस्थळावर पाहता येईल -
www.maharesult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

Last Updated : Jul 28, 2020, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.