ETV Bharat / state

नायर रुग्णालयाच्या कोरोना योध्यांचे कोविड काळात 'असे'ही योगदान - नायर रुग्णालय निवासी डॉक्टर रक्तदान न्यूज

मार्च महिन्यापासून डॉक्टर कोरोनाशी दोन हात करत आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या कामाचे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही कौतुक झाले आहे. आता याच डॉक्टरांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

Blood Donation
रक्तदान
author img

By

Published : Nov 26, 2020, 7:19 PM IST

मुंबई - कोरोना काळात मुंबई महानगर पालिकेच्या नायर रुग्णालयाने उत्तम कामगिरी बजावली आहे. त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. या कामगिरीमध्ये सर्वात मोठी आणि महत्वाची भूमिका बजावली आहे ती निवास डॉक्टरांनी. मार्चपासून न थकता जीवाची बाजी लावून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या या निवासी डॉक्टरांनी आता आणखी वेगळ्या प्रकारे रुग्णसेवा केली आहे. नायरमधील निवासी डॉक्टरांनी सामाजिक भान राखत आज एका रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी 105 कोरोना योध्या डॉक्टरांनी रक्तदान केले. तर कोरोनामुक्त 15 निवासी डॉक्टरांनीही आपले सामाजिक दायित्व ओळखत प्लाझ्मा दान केले.

रक्तदान करताना निवासी डॉक्टर
रक्तदान करताना निवासी डॉक्टर

म्हणून केले रक्तदान शिबिराचे आयोजन -
मोठ्या शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त रुग्ण आणि इतर अनेक रुग्णांना रक्ताची गरज लागते. मुंबईत मोठ्या संख्येने ब्लड बँक असून त्यात रक्त साठवून ठेवले जाते. वैयक्तिक रक्तदान किंवा रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हे रक्त जमा केले जाते आणि आवश्यकतेनुसार त्याचा वापर रुग्णांसाठी केला जातो. या ब्लड बँकेत किमान 20 दिवस पुरेल इतका रक्त साठा असतो. मात्र कोरोना काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मुळात कोरोनाच्या भीतीने आणि खबरदारी म्हणून वैयक्तिक रक्तदान खूपच कमी झाले आहे. तर कोरोना काळात रक्तदान शिबिरेही कमी झाली. शिबिरावर मर्यादा आल्या आहेत. तेव्हा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता नायर मार्ड संघटनेने आज रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

काही कोरोनामुक्त डॉक्टरांनी प्लाझ्मा दान केले

61 पिशव्या रक्त जमा तर 15 डॉक्टरांकडून प्लाझ्मा दान -
नायर रुग्णालयात मार्डकडून सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत निवासी डॉक्टरांसाठी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला निवासी डॉक्टरांनी चांगला प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने डॉक्टरांनी याला उपस्थिती लावली. यातील 105 निवासी डॉक्टरांना रक्तदान करता आले. कोरोना मुक्त झाले तरी वर्षभर रक्त दान करता येत नसल्याने अशा डॉक्टरांना रक्तदान करता आले नाही. तर काहींना इतर काही कारणाने रक्त देता आले नाही. असे असले तरी 105 डॉक्टरांनी रक्तदान करून 61 पिशव्या रक्त जमा केल्याची माहिती नायर मार्डचे अध्यक्ष डॉ. सतीश तांदळे यांनी दिली. दरम्यान, कोरोना मुक्त डॉक्टरांना रक्तदान करता आले नसले तरी अशा १५ डॉक्टरांनी प्लाझ्मा दान केल्याचेही तांदळे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.