मुंबई : कांदिवली येथील सरोवर टॉवरच्या रेस्क्यू माळ्यावर असलेल्या सज्जावर एक मानसिक रुग्ण उतरला होता. हा व्यक्ती या माळ्यावर उतरल्यानंतर बेशुद्ध पडला होता. या व्यक्तीची मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे.
२२ व्या मजल्यावर अडकला : कांदिवली पूर्व येथे सरोवर साहेब हे टॉवर आहे. या टॉवरमध्ये २२ व्या मजल्यावर रेस्क्यू माळा आहे. या माळ्यावर असलेल्या सज्जावर एक मानसिक आजार असलेला रुग्ण उतरला होता. या सज्जावर उतरल्यानंतर हा मानसिक रुग्ण बेशुद्ध पडला. येथील रहिवाशांनी याची माहिती पोलीस तसेच मुंबई अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
सुखरूप सुटका : मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी या व्यक्तीला सज्जावरून बाहेर काढण्यासाठी आपला एक जवान रशीच्या साह्याने सज्जावर उतरवला. राजुदास राठोड हा जवान सज्जावर उतरला. त्याने या मानसिक आजार असलेल्या व्यक्तीला सज्जावरून खाली न पडता सुखरूप आपल्या सहकाऱ्यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर या व्यक्तीला पोलिसांच्या हवाली करून रुग्णालयात पाठवण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी २२ व्या मजल्यावरून या मानसिक आजार असलेल्या रुग्णाची सुखरूप सुटका केल्याने कौतुक केले जात आहे.
मुंबई अग्निशमन दल : मुंबई अग्निशमन दल नेहमीच आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्पर असते. एखादी आग लागली असू देत, व्यक्ती किंवा पक्षी प्राणी कोणी अडकले असू देत, गटारात समुद्रात कोणी वाहून गेल्यास त्यांची सुखरूप सुटका करण्याचे काम मुंबई अग्निशमन दलाकडून केले जाते. मुंबई अग्निशमन दलाकडून केल्या जाणाऱ्या कामाची वाहवा देशभरात केली जाते.तर मुंबईत सातत्याने लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे अग्निशमन दल आणखी बळकट करण्यावर मुंबई महापालिकेने भर दिला आहे. मुंबई अग्निशमन दल हे देशात आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्रीने अव्वल आहे. अग्निशमन दलाने परदेशातही आपत्कालीन परिस्थितीत काम केले आहे. वाढत्या आगीच्या दुर्घटनांच्या घटना लक्षात घेऊन अग्निशमन दल आणखी बळकट करण्याच्यादृष्टीने पालिकेने पावले उचलली आहेत. अग्निशमन दलात डिजिटल मोबाइल रेडिओ प्रणाली, आग विझविण्यासाठी रोबो व ९० मीटरपर्यंत उंचीचे टर्न लॅडर, आरटीक्युलेटेड वॉटर टॉवर हॅजमेट यासह विविध अत्याधुनिक यंत्रणा आहे.
हेही वाचा: Mumbai News देवावरचा विश्वास उडाल्याने नैराश्यातून तरुणाची मदर मेरी ग्रोटोवर दगडफेक पोलिसांनी ठोकल्या बेड्या