मुंबई : Refused House to Marathi Woman : तृप्ती देवरुखकर या महिलेनं तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला माफी मागायला लावली. मात्र, तृप्ती देवरुखकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओनंतर चांगलाच संताप व्यक्त केला जातोय.
मराठी महिलेला नाकारलं घर : तृप्ती देवरुखकर यांना मराठी भाषिक असल्याच्या कारणावरून मुलुंड, मुंबई येथील शिवसदन सहकारी गृहनिर्माण संस्थेनं सदनिका नाकारण्यात आली. तसेच याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानं संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचं वृत्त आहे.
-
तृप्ती देवरुखकर ह्या मराठी भगिनीला आलेल्या अनुभवातून किमान आता तरी काही महाभागांना कळलं असेल कि महाराष्ट्राच्याच राजधानी मुंबईत मराठी मनं किती अस्वस्थ आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी कोणताही लढा उभा करते तेव्हा राष्ट्रीय प्रवाहात आमचं 'देश… pic.twitter.com/iXJOi9GlWC
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">तृप्ती देवरुखकर ह्या मराठी भगिनीला आलेल्या अनुभवातून किमान आता तरी काही महाभागांना कळलं असेल कि महाराष्ट्राच्याच राजधानी मुंबईत मराठी मनं किती अस्वस्थ आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी कोणताही लढा उभा करते तेव्हा राष्ट्रीय प्रवाहात आमचं 'देश… pic.twitter.com/iXJOi9GlWC
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 27, 2023तृप्ती देवरुखकर ह्या मराठी भगिनीला आलेल्या अनुभवातून किमान आता तरी काही महाभागांना कळलं असेल कि महाराष्ट्राच्याच राजधानी मुंबईत मराठी मनं किती अस्वस्थ आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी कोणताही लढा उभा करते तेव्हा राष्ट्रीय प्रवाहात आमचं 'देश… pic.twitter.com/iXJOi9GlWC
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 27, 2023
काय आहे तरतूद : भारतीय राज्य घटनेचे अनुच्छेद 15 अन्वये धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान या आधारावर कोणत्याही नागरिकासोबत भेदभाव करता येणार नाही, अशी तरदुत करण्यात आली आहे. यामध्ये जात आणि भाषा अनुस्युत आहेत. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मध्ये सुद्धा विशिष्ट जाती, धर्म, भाषा यांना गृहनिर्माण संस्थेत घर देऊ नये, अशी कोणतीही मुभा संस्थेला देण्यात आलेली नाही. असे असतानाही बहुतांश सहकारी गृहनिर्माण संस्था विशिष्ट जाती, धर्म, भाषा आणि आहार पद्धती या आधारावर उघडपणे भेदभाव करत आहेत. गृह योजनांच्या जाहिराती आणि वेबसाईटवरही फक्त ' गेटेड कम्युनिटी ' साठी असे ठळकपणे लिहिलेले असते. याबाबत सहकार विभाग आणि गृहनिर्माण विभाग यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करणं गरजेचे आहे.
-
होय, मुंबई आमच्या बापाचीच, मराठी माणसाचीच ! #मनसेदणका pic.twitter.com/6ZzJM33HlA
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">होय, मुंबई आमच्या बापाचीच, मराठी माणसाचीच ! #मनसेदणका pic.twitter.com/6ZzJM33HlA
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 27, 2023होय, मुंबई आमच्या बापाचीच, मराठी माणसाचीच ! #मनसेदणका pic.twitter.com/6ZzJM33HlA
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 27, 2023
चीड आणणारी घटना : मराठी महिलेला घर नाकारल्यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरे म्हणाले की, ही चीड आणणारी घटना आहे. पण प्रश्न हा आहे, की हे पाहून मिंधे-भाजपा सरकार काय करणार? आमच्या मराठमोळ्या वारकऱ्यांवर, बारसूमधल्या महिलांवर, मराठा समाजावर लाठ्या चालवल्या. तसा इथेही कायद्याचा धाक दाखवणार, की दिल्लीश्वर नाराज होतील म्हणून ‘हाताची घडी तोडांवर बोट’ ठेवून गप्प बसणार? या बिल्डींगवर कारवाई होणार का? BMC आणि पोलीस पाठवणार का? की ‘थॅंक यू’ म्हणून बुलेट ट्रेनच्या कामाला वेग देणार? हिम्मत करा, कायद्याचा धाक ‘इथे’ दाखवा, अतिशय संतप्त करणारी ही घटना आहे.
महिला आयोगाकडून दखल : भाषावार राज्य निर्मितीच्या आधारावर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला आहे. असं असलं तरी, महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत मराठी भाषिक महिलेला सदनिका नाकारली जाते, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळं या घटनेची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं घेतली आहे. याप्रकरणी सहकार आयुक्त तसेच गृहनिर्माण विभागचे प्रधान सचिव यांना चौकशी करून अहवाल मागविण्यात आला आहे.त्याचप्रमाणे याप्रकरणी संबंधित महिलेला भाषेच्या आधारे दुय्यम वागणूक देऊन मारहाण करण्यात आल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहेत.
हेही वाचा -
- Raj Thackeray on Marathi Signboards : दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, राज ठाकरे म्हणाले, मूठभर व्यापाऱ्यांनी...
- MNS preparations for Lok Sabha : मनसेकडून लोकसभेची जोरदार तयारी, अमित ठाकरेंनी नाशिकच्या दौऱ्यात काय आखली रणनीती?
- MNS Warning Toll Administration : टोल नाक्यांविरोधात मनसे पुन्हा आक्रमक; ...तर आमच्याशी गाठ, टोल प्रशासनाला इशारा