मुंबई Refused House To Marathi : मराठी महिलेला मुलुंडमध्ये घर नाकारल्यानं मोठा गदारोळ सुरू आहे. मराठी महिलेला घर नाकारल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दम दिल्यानंतर या पिता पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पिता पुत्राला भिडलेल्या तृप्ती देवरुखकर या महिलेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. मनसेच्या नेत्या आणि राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी घरी बोलावून घेत त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी तृप्ती देवरुखकर यांनी पिता पुत्राला भिडून हिंमत दाखवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करत असल्याचं शर्मिला ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
काय आहे प्रकरण : मुलुंड उपनगरातील गुजरातीबहुल सोसायटीत ऑफिससाठी जागा घेण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेनं केला होता. या भांडणाचा व्हिडिओ पुढं आल्यानंतर मुंबईत मोठा राजकीय वाद निर्माण झाला. तृप्ती देवरुखकर यांचा आणि सोसायटी सदस्यांमधील भांडणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुलुंड पोलिसांनी तक्रार नोंदवली. ही घटना बुधवारची असून तृप्ती देवरुखकर कार्यालयासाठी जागा पाहण्यासाठी मुलुंडमधील शिवसदनमध्ये गेल्या होत्या. मात्र मराठी असल्यानं त्यांना जागा देण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व प्रकरणावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला दम : बुधवारी हा व्हिडिओ व्हायरल होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सदर आरोपींना मनसे स्टाईल दम दिला. त्यामुळे या पिता पुत्रांनी मराठीत माफी मागितली आणि याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर राजकारण सुरू झालं. मंत्री उदय सामंत यांनी या महिलेची भेट घेतली. इतर पक्षांच्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. आता या सर्व प्रकरणावर राज ठाकरे यांनी जनतेला आणि सरकारला एक आवाहन करणारी पोस्ट लिहिली आहे.
तृप्ती देवरुखकर यांचा सत्कार : राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी तृप्ती देवरुखकर यांना आपल्या घरी बोलून त्यांच्या सत्कार केला. तृप्ती देवरुखकर यांनी जी हिंमत दाखवली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन देखील केलं. शर्मिला ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना देवरुखकर यांनी सांगितले की, "आज मी शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली. मी जेव्हा हा प्रश्न पुढं आणला, तेव्हा मनसेनं मदत केली. अनेकांनी फोन केले, असा प्रकार आमच्यासोबतही झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मी फक्त ती जागा बघायला गेले होते. मी जागा फक्त बघितली घ्यायचा की नाही, ते आम्ही नंतर ठरवणार होतो. पण, ती जागा मला योग्य वाटली नव्हती. मी बघून आले आणि लॉक लावलं तेव्हा त्यांनी आम्ही मराठी आणि महाराष्ट्रीयन आहोत म्हणून जागा नाकारली. यामुळे खूप चीड आली होती." अशी प्रतिक्रिया तृप्ती देवरुखकर यांनी दिली.
हेही वाचा :