ETV Bharat / state

खुशखबर.. डिसेंबरपर्यंत राज्यात पोलीस दलातील १२ हजार ५३८ पदांची भरती - अनिल देशमुख न्यूज

राज्यातील पोलीस दलामध्ये विविध पदांवर जवळपास १२ हजार ५३८ पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Recruitment of 12 thousand 538 posts in police force in the state till December
गृहमंत्री अनिल देशमुख
author img

By

Published : Jul 18, 2020, 5:07 PM IST

मुंबई - राज्यातील पोलीस दलामध्ये विविध पदांवर जवळपास १२ हजार ५३८ पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या संदर्भातील एक बैठक नुकतीच मंत्रालयात संपन्न झाली. त्यावेळी देशमुख बोलत होते.

या बैठकीस गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे, अप्पर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, वित्त विभाग प्रधान सचिव नितीन गद्रे, प्रधान सचिव पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल, प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता उपस्थित होते.

सध्याच्या काळामध्ये पोलीस विभागाने अत्यंत महत्त्वाचे कार्य केलेले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई वर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे या संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. पोलीस शिपाई गट क संवर्गातील २०१९ या भरती वर्षात रिक्त असलेली ५ हजार २९७ पदे व २०२० या भरती वर्षात सेवानिवृत्ती, पदोन्नती, राजीनामा यामुळे रिक्त होणारी पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण ६ हजार ७२६ पदे भरण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ अशी एकूण १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

२०१९ मध्ये अर्ज केलेल्यांना दिलासा

२०१९ मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी ज्यांनी महा आयटी पोर्टलमार्फत अर्ज केलेले आहेत. त्या अर्जाबाबतही योग्य ती कार्यवाही केली जाईल. पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी अशा विविध टप्प्यावर पार पडत असल्याने ही प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहते. त्यामुळे एकाच भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त पदे भरण्याबाबत विभाग विचार करत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.