ETV Bharat / state

Mumbai ranibag : राणीबागेला रेकॉर्ड ब्रेक पर्यटकांची भेट, एकाच दिवसात हजारो पर्यटकांनी दिली भेट

author img

By

Published : Oct 30, 2022, 10:38 PM IST

शाळांना सुट्टी असल्याने राणीबागेत म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात ( At Veermata Jijabai Bhosle Park ) रोजच पर्यटकांची गर्दी वाढली आहे. रविवार ( ३० ऑक्टोबर  ) सुट्टीचा दिवस असल्याने एकाच दिवशी विक्रमी ३१ हजार २३२ पर्यटकांनी दिली भेट दिली. २९ आणि ३० ऑक्टोबर या दोन दिवसात तब्बल ५८ हजार ६२४ पर्यटकांनी भेट दिली, त्यामधून राणीबागेला सुमारे २० लाख ९३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

ranibagh record break
राणीबागेला रेकॉर्ड ब्रेक पर्यटकांची भेट

मुंबई - शाळांना सुट्टी असल्याने राणीबागेत म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात ( At Veermata Jijabai Bhosle Park ) रोजच पर्यटकांची गर्दी वाढली आहे. रविवार ( ३० ऑक्टोबर ) सुट्टीचा दिवस असल्याने एकाच दिवशी विक्रमी ३१ हजार २३२ पर्यटकांनी दिली भेट दिली. २९ आणि ३० ऑक्टोबर या दोन दिवसात तब्बल ५८ हजार ६२४ पर्यटकांनी भेट दिली, त्यामधून राणीबागेला सुमारे २० लाख ९३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

एकाच दिवसात तब्बल ३१ हजार २३२ पर्यटकांनी मुंबईतील राणीबाग प्राणीसंग्रहालयात भेट दिली.

राणीबागेत विक्रमी पर्यटक संख्येची नोंद - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय आहे, याला राणीबाग म्हणून ओळखले जाते. राणीबागेचे नूतनीकरण करून या ठिकाणी विविध पक्षी, प्राणी आणण्यात आले आहेत. पेंग्विन, वाघ, बिबट्या, अस्वल, तरस आदी प्राणी पक्षी पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी वाढत असते. २९ मे २०२२ रोजी एकाच दिवशी ३० हजार ३७९ पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन विक्रमी संख्येची नोंद केली होती. त्या दिवशी सुमारे १० लाख ८४ हजार ७४५ रुपयांचे महसुली उत्पन्न महानगरपालिकेच्या तिजोरी जमा झाले होते. हा विक्रम आज (दिनांक ३० ऑक्टोबर २०२२) रोजी मोडीत निघाला आहे. आज एकाच दिवसात तब्बल ३१ हजार २३२ पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. त्यातून सुमारे ११ लाख ०५ हजार ९२५ रुपयांचे महसुली उत्पन्न प्राप्त झाले.

एकाच महिन्यात अडीच लाख पर्यटक - शनिवारी (२९ ऑक्टोबर २०२२) देखील २७ हजार ३९२ पर्यटकांनी भेट दिली होती. त्यातूनही ९ लाख ८८ हजार ०२५ रुपये उत्पन्न मिळाले. आज एकाच दिवसात तब्बल ३१ हजार २३२ पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. त्यातून सुमारे ११ लाख ०५ हजार ९२५ रुपयांचे महसुली उत्पन्न प्राप्त झाले. दोन दिवसात ५८ हजार ६२४ पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद झाली असून त्यातून एकूण २० लाख ९३ हजार ९५० रुपये इतके विक्रमी महसुली उत्पन्न देखील प्राप्त झाले आहे. एकाच महिन्यात सुमारे अडीच लाख पर्यटकांनी वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाला भेट दिल्याची नोंद झाली असून, त्यातून तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळाले आहे.

ranibagh record break
राणीबागेला रेकॉर्ड ब्रेक पर्यटकांची भेट

पर्यटकांची सोय - विशेष म्हणजे, विक्रमी संख्येने पर्यटक दाखल होत असल्याने कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच अतिरिक्त पंधरा सुरक्षा रक्षक नेमून गर्दीचे योग्य रीतीने नियंत्रण करण्यात आले. तसेच पर्यटकांचे व्यवस्थापन करताना काळजी म्हणून दोनदा मुख्य प्रवेशद्वार तात्पुरते बंद करून नियोजन करण्यात आले. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढून देखील अतिशय योग्य रीतीने सर्वांना पक्षी, प्राणी आणि उद्यान पाहता येईल, याची प्राणिसंग्रहालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळजी घेतली अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.