ETV Bharat / state

अंधेरीतील दुर्घनटनाग्रस्त 'गोखले पुलाची' पुनर्बांधणी; पालिका करणार १३८ कोटींचा खर्च

पालिकेने अंधेरी येथील गोखले पूल पाडून नव्याने पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी पालिका १३८ कोटी रुपये खर्च करणार आहे. पालिकेने केलेल्या अंदाजित दराच्या तुलनेत ही रक्कम १८ टक्के अधिक आहे.

reconstruction-of-gokhale-bridge-in-andheri-mumbai
गोखले पुलाची पुनर्बांधणी
author img

By

Published : Feb 11, 2020, 8:58 PM IST

मुंबई - अंधेरी येथील गोखले पूल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पुलाची दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर पालिकेने अंधेरी येथील गोखले पूल पाडून नव्याने पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी पालिका १३८ कोटी रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समतीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. पालिकेने अंदाजित केलेल्या रक्कमेपेक्षा ही रक्कम जास्त असल्याने स्थायी समितीत वाद होण्याची शक्यता आहे.

गोखले पुलाची होणार पुनर्बांधणी...

हेही वाचा- काँग्रेसने मागील निवडणुकांमधून काहीच धडा घेतला नाही, जगदीश शर्मांचा पक्षाला घरचा आहेर..

अंधेरी पूर्व व पश्चिमेला प्रवास करणाऱ्यांसाठी गोपाळ कृष्ण गोखले हा रेल्वेवरील उड्डाणपूल आहे. ३ जुलै २०१८ रोजी या पुलावरील पादचारी पुलाचा काही भाग कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पालिकेने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये अंधेरी येथील गोखले पूल धोकादायक अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. पूल धोकादायक असल्याने तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती करून या रेल्वे उड्डाणपुलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्यावतीने या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी निविदा मागवण्यात आल्या असून त्यात दोन कंपन्यांनी सहभाग दर्शवला आहे. त्यात आंध्र प्रदेशातील एमएमएस इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला महापालिकेने कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिका १३८ कोटी रुपये खर्च करणार आहे. पालिकेने केलेल्या अंदाजित दराच्या तुलनेत ही रक्कम १८ टक्के अधिक आहे. यामुळे स्थायी समितीत वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुलाची एकूण लांबी - २६५ मीटर
पुलाची रुंदी - दोन्ही बाजूच्या पदपथासह २६.८ मीटर
बांधकामाचा प्रकार - आर.सी.सी स्ट्रक्चर आणि स्टील गर्डर

Intro:मुंबई - मुंबईत अंधेरी येथील गोखले पूल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पुलाची दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेनंतर पालिकेने अंधेरी येथील गोखले पुल पाडून नव्याने पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी पालिका १३८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समतीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. पालिकेने अंदाजित केलेल्या रक्कमेपेक्षा हि रक्कम जास्त असल्याने स्थायी समितीत वाद होण्याची शक्यता आहे.Body:अंधेरी पूर्व व पश्चिमेला प्रवास करणाऱ्यांसाठी गोपाळ कृष्ण गोखले हा रेल्वेवरील उड्डाणपूल आहे. ३ जुलै २०१८ रोजी या पुलावरील पादचारी पुलाचा काही भाग कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पालिकेने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये अंधेरी येथील गोखले पूल धोकादायक अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. पूल धोकादायक असल्याने तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती करून या रेल्वे उड्डाणपुलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्यावतीने या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी निविदा मागवण्यात आल्या असून त्यात दोन कंपन्यांनी सहभाग दर्शवला आहे. त्यात आंध्र प्रदेशातील एमएमएस इन्फ्रास्ट्क्चर लिमिटेड कंपनीला महापालिकेने कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिका १३८ कोटी रुपये खर्च करणार आहे. पालिकेने केलेल्या अंदाजित दराच्या तुलनेत ही रक्कम १८ टक्के अधिक आहे. यामुळे स्थायी समितीत वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुलाची एकूण लांबी : २६५ मीटर
पुलाची रुंदी : दोन्ही बाजूच्या पदपथासह २६.८ मीटर
बांधकामाचा प्रकार : आर.सी.सी स्ट्क्चर आणि स्टिल गर्डर

बातमीसाठी VIVO pkg Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.