ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही : आदित्य ठाकरे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने बंडखोरी करत आसामच्या आश्रय घेतला. येथील पंधरा ते सोळा आमदार आमच्या संपर्कात आहेत. विकले गेले त्यांना शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. या सर्व बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही, (Rebels will not be allowed to climb the steps of Vidhan Bhavan) असा निर्धार मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aditya Thackeray) यांनी केला आहे.

Aditya Thackeray
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Jun 26, 2022, 3:48 PM IST

Updated : Jun 26, 2022, 4:03 PM IST

मुंबई: आसाममध्ये एकीकडे पूर आला आहे. तिथे लोकांना संरक्षण द्यायला हवे होते. पण हे संरक्षण बंडखोरांना दिले आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव घ्यायची त्यांची लायकी नाही. असती तर तुम्ही बंड करुन सूरतला गेला असता का असा असा सवाल आदित्य ठाकरे यांनी लगावला. खरोखर यांच्यात ताकद, लाज स्वाभिमान असता तर समोर येऊन त्यांनी बंड केले असते. महाराष्ट्रात लपायची हिंमत नाही म्हणून सूरतला पळाले आहेत, असे म्हणत आदित्य यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.

प्रत्येक आमदार जरी तिथे गेला तरी विजय हा शिवसेनेचाच होणार असल्याचा विश्वास मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात गेल्यावर सभेत उठून एका शेतकऱ्याने मला सांगितले की भुमरे पाच टर्म आमदार झाले आहेत, त्यांना मंत्रीपदाची संधी द्या. त्यानंतर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना याबाबत बोललो. त्यानंतर संदीपान भुमरे यांना मंत्रीपद दिले, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. धनुष्यबाण हा आपलाच राहणार, शिवसेना पक्ष आणि प्रेम आपलच राहणार.

बंडखोरांपुढे दोनच पर्याय आहेत. एकतर प्रहार पक्षात विलीन व्हा, नाही तर भाजपमध्ये विलीन होणे हेच पर्याय आहेत. मात्र, फुटीरवाद्यांना शिवसेनेत स्थान नाही. ज्यांना ताकद नव्हती त्यांना सेनेने ताकद दिली. मात्र हिंमत असेल तर राजीनामा द्या निवडणुकीला सामोरे जा असे आव्हान मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिले. यावेळी विधानभवनाची पायरी चढू देणार नाही. त्यांना निवडणुकीत पाडणार असा निर्धार मंत्री आदित्य ठाकरे केला. तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि परत निवडून येऊन दाखवा, असाही इशाराही मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला.

हेही वाचा : Maharashtra Poltical Crisis : शिवसेनेचा आठवा मंत्री शिंदेच्या गटाकडे रवाना

Last Updated : Jun 26, 2022, 4:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.