ETV Bharat / state

Rane vs Raut: कुठेही बोलवा, मी यायला तयार! संजय राऊतांच्या टिकेनंतर राणेंचा प्रहार

खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जहरी टीका करत नारायण राणे केंद्रीय सुरक्षा घेऊन फिरत आहेत. त्यांच्यात हिम्मत असेल तर, त्यांनी विना सुरक्षा फिरून दाखवावे असे आव्हान संजय राऊत यांनी नारायण राणे यांना दिले होते. (Rane vs Raut) त्यावर राणे यांना माध्यामांनी याबाबत विचारले असता संजय राऊत जिथे बोलतील तिथे मी केव्हाही यायला तयार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, राणे-राऊत हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Rane vs Raut
संजय राऊतांच्या टिकेनंतर राणेंचा प्रहार
author img

By

Published : Jan 7, 2023, 11:49 AM IST

मुंबई - आपली सुरक्षा सोडून आपण संजय राऊत बोलतील तिथे जाऊ असा इशारा नारायण राणे यांनी संजय राऊत यांना दिला आहे. संजय राऊत यांनी खासदार म्हणून कधीही लोककल्याणाची कामे, धार्मिक कामे केलेली नाहीत. एक संपादक म्हणूनही त्यांनी कोणतेही विकासाबाबत साधा एखादा लेख ही लिहिला नाही. केवळ टीका करणे हेच संजय राऊत यांचे काम आहे. आज शिवसेना संपवण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे. (Sanjay Raut criticism of Raut) आपण कधीही शिवसेना संपवली नाही. जोपर्यंत, आपण शिवसेनेमध्ये होतो तोपर्यंत आपण शिवसेना वाढवण्यातच काम केले. मात्र, आता संजय राऊत शिवसेनेला लयास घेऊन गेले आहेत. आजच्या राजकारणातील संजय राऊत हे जोकर आहेत अशी जहरी टीका नारायण राणे यांनी मुंबई प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांच्यावर केली आहे.

एकदा तरी उद्धव ठाकरे यांना भेटणार - यावेळी बोलताना आपण एकदा तरी उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे नारायण राणे हे म्हणाले आहेत आपण केंद्रात मंत्री झाल्यानंतर अनेक वेळा राज्यसभेत आपल्या बाजूला येऊन संजय राऊत हे बसत होते. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या बाबत जे संजय राऊत बोलले आहेत ते सर्व आपण उद्धव ठाकरेंना सांगणार आहोत. हे ऐकल्यानंतर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे संजय राऊत यांना चपलेने मारल्याशिवाय राहणार नाहीत असा टोलाही संजय राऊत यांना नारायण राणे यांनी लगावला आहे.

काशीला जाणाऱ्या ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा - भाजपा आमदार राम कदम यांनी 3000 च्या वर लोकांना काशी यात्रा घडवण्यासाठी एक विशेष ट्रेनने मुंबईच्या लोकमान्य टर्मिनस येथून काशीला घेऊन गेली आहे. या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सकाळी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचले. यावेळी संजय राऊत यांच्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता रामाच्या ठिकाणी रावणाचं नाव घेऊ नका असा तुलाही नारायण राणे यांनी संजय राऊत यांना लगावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.