मुंबई : आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) वाचा. भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होते आहे, आज अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल आहे, नारायण राणेंची सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषद आहे, युवा साहित्य संमेलन, तसच अभिनेते प्रशांत दामले यांच्या वैयक्तिक नाटकाचा 12500वा प्रयोग आज होतो आहे. या महत्त्वाच्या घडामोडी आहेत.
भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात : भारत जोडो यात्रा आज म्हणजेच 6 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होत ( Bharat Jodo Yatra in Maharashtra ) आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. 8 नोव्हेंबरला शरद पवार स्वतः या यात्रेत सहभाग घेणार असल्याचे बोलले जात आहे. राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून या यात्रेला सुरुवात केली. काश्मीरला या यात्रेचा शेवट होणार आहे. एकूण 3570 किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा काश्मीरला पोहोचणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून महाराष्ट्रात या यात्रेला सुरुवात होणार आहे. राहुल गांधी 5 दिवस नांदेड जिल्ह्यात वास्तव्यास असणार आहेत. सोमवारी 7 नोव्हेंबरला देगलूर बसस्थानकापासून सकाळी 6:30 वाजता भारत जोडो यात्रेस सुरुवात होईल.
नारायण राणेंची पत्रकार परिषद : सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली ( Narayan Rane press conference) आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. शनिवारी जिल्हा नियोजन बैठक चांगलीच वादळी ठरली . केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यात बैठकीच्या सुरवातीलाच शाब्दिक बाचाबाची झाली. सभेच्या सुरुवातीलाच जिल्हा नियोजनची सभा कोण चालवतं असा प्रश्न खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला. त्यानंतर नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात बाचाबाची झाली.
आज अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल : ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष अशा झालेल्या लढतीचा निकाल आज लागणार ( Andheri East ByElection Result ) आहे. रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान 3 नोव्हेंबरला पार पडलं. आज या निवडणुकीचा निकाल आहे. सकाळी 8 वाजता टपाल मतमोजणीला सुरुवात होईल. मतदानाच्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत 9.72 टक्के मतदानाची टक्केवारी होती. दुपारी 1 वाजेपर्यंत 16.89 टक्के मतदान झाले. तर दुपारी 3 वाजेपर्यंत 22. 85 टक्के; सायंकाळी 5 वाजेपर्यंत 28.77 टक्के मतदान झाले. तर मतदान प्रक्रियेच्या अखेरीस अर्थात मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मतदारसंघात सुमारे 31.74 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी दिली.
अभिनेते प्रशांत दामले : अभिनेते प्रशांत दामले हे आज नवा रेकॉर्ड करणार ( Prashant Damle new record) आहे. प्रशांत दामले यांच्या वैयक्तिक नाटकाचा 12500वा प्रयोग 6 नोव्हेंबरला होणार आहे. 12500 प्रयोगांच्या रेकॉर्ड आधी प्रशांत दामलेंच्या 'या' रेकॉर्ड्सची लिम्का बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे.
युवा साहित्य संमेलन : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संघाची अकोला शाखा व इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 5 व 6 नोव्हेंबर 2022 दरम्यान आयोजित करण्यात ( Youth Literature Conference )आले. त्याचा आज सामोरप होणार आहे. स्व. बाजीराव पाटील साहित्य नगरी, प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशिम रोड, अकोला येथे होत आहे. शनिवारी उद्घाटन झाले. अकोल्याचे आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, साहित्यिक व विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, स्वागताध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे यांची प्रमुख उपस्थिती राहिली. या दोन दिवसीय संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, टॉक शोचे आयोजन करण्यात आले आहे. आज दुपारी 1 वाजता माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेत ‘युवा आयकॉन पुरस्कार’ वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.