मुंबई : Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्र या प्रकरणाची सुनावणी मागील अनेक महिन्यापासून सुरू होती. याचा आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. अंतिम निर्णय देताना दोन्ही पक्ष असू शकतात. त्यामुळे दोन्हीकडील आमदार अपात्र करता येणार नाही, असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय. या निर्णयानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असताना, ठाकरे गटाने यावर संतप्त प्रतिक्रिया दिलीय. तर, सत्याचाच शेवटी विजय होतो आणि शिवसेना हा पक्ष आमचाच खरा आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाने दिलीय.
निर्णयाने लोकशाहीचा मुडदा पडला : सर्वोच्च न्यायालयाचे जे नियम होते आणि जसे निर्देश दिले होते त्याचा विधानसभा अध्यक्षांनी अवमान केला आहे. विधानसभा अध्यक्षांचा निकाल अत्यंत चुकीचा आहे, अशी प्रितिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी या निकालानंतर दिलीय. निकाल आधीच द्यायचा होता, तर वर्षभराचा कालावधी का घेतला? पक्ष हा एक नसून, दोन असू शकतात हा निर्णय चुकीचा आहे, असं दानवे म्हणाले. सुप्रीम कोर्टाच्या सर्व गोष्टी आणि नियम हे सर्व विधानसभा अध्यक्ष यांनी धाब्यावर बसवलेत. लोकशाहीचा विधानसभा अध्यक्षांनी मुडदा पडला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया अंबादास दानवेने यांनी दिलीय. दरम्यान, या निकाला विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेणार असून, या निकालाला आव्हान देणार आहोत असं दानवे म्हणालेत. आम्हाला नक्कीच सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल. ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांना अपात्र करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केलीय. तसंच, हा निर्णय लोकशाहीसाठी घातक आहे. या निर्णया विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असून, विधानसभा अध्यक्ष यांनी लोकशाहीचा गळा घोटला आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी दिली आहे.
पक्षांतर्गत लोकशाही असली पाहिजे : आज एकाच व्यक्तीचं मत अंतिम मत नाही हे सिद्ध झालं. मतदारांनी आम्हाला युतीमधून निवडून दिले. हा निर्णय म्हणजे लोकशाहीला धरून आहे, असं मंत्री दीपक केसरकर म्हणालेत. दोन्ही गटाचे आमदार अपात्र नाहीतच असा निर्णय विधानसभा अध्यक्ष यांनी दिला आहे, तो योग्य आहे असं केसरकर म्हणाले. शेवटी सत्याचा विजय झाला. मला प्रतोद केले होते तेच योग्य होतं, असे विधानसभा अध्यक्ष म्हणालेत. तसंच, निकाल आमच्या बाजूने लागला असून आम्ही जल्लोष साजरा करणार आहोत असंही शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यावेळी म्हणालेत.
हेही वाचा :
1 खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची, अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया
2 अखेर शिवसेना शिंदेंची झाल्याचं शिक्कामोर्तब, बुलडाण्यात आमदार संजय गायकवाड यांनी केला जल्लोष
3 उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर पवारांची प्रतिक्रिया