ETV Bharat / state

काय आहेत पीएमसी बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध?

आरबीआयकडून लादण्यात आलेल्या निर्बंधानंतर या संदर्भात आपण अर्थ मंत्रालय व आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून लवकरात लवकर बँक ग्राहकांना या समस्येतून बाहेर कसे काढता येईल? याबद्दल चर्चा करत असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

काय आहेत पीएमसी बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध
author img

By

Published : Sep 24, 2019, 7:28 PM IST

Updated : Sep 24, 2019, 9:32 PM IST

मुंबई - पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर ( पीएमसी बँक) आरबीआयने निर्बंध आणले आहेत. त्यामुळे पीएमसी बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यातून केवळ एक हजार रुपये काढता येणार आहेत. आरबीआयकडून 35 अ अनुसार पुढील सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत.

हे ही वाचा - पीएमसी बँकेच्या संदर्भात आरबीआय व अर्थ मंत्रालयाशी संपर्क सुरू आहे - किरीट सोमय्या

बँक ग्राहक व छोटे गुंतवणूकदार यांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. आरबीआयकडून लादण्यात आलेल्या निर्बंधानंतर या संदर्भात आपण अर्थ मंत्रालय व आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. लवकरात लवकर बँक ग्राहकांना या समस्येतून बाहेर कसे काढता येईल? याबद्दल चर्चा करत असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

पीएमसी बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध काय आहेत -

  • पीएमसी बँक खातेदारांवर आरबीआयकडून लादण्यात आलेल्या निर्बंधानंतर एका खातेधारकाला एका खात्यात कितीही रक्कम असली तरी केवळ 1 हजार रुपयेच काढता येतील.
  • एखाद्या ग्राहकाने पीएमसी बँकेकडून मुदत ठेवीवर कर्ज घेतले असेल तरी कर्ज फेडण्यासाठी त्याच्या ठेवीचा वापर बँक ग्राहक करू शकतो.
  • पीएमसी बँकेवर आरबीआयने बँकिंग कलम '35 अ' नुसार निर्बंध लादल्यानंतर पीएमसी बँकेवर मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करताना आरबीआयची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. यापुढे ६ महिने तरी आरबीआयच्या परवानगीशिवाय बँकेला कुठलेही नवीन कर्ज वाटप करता येणार नाही.

जुन्या कर्जाच्या नुतनीकरणावर आरबीआयने तात्पुरती बंदी आणली असून पुढील सहा महिने पीएमसी बँक प्रशासनाला कुठलीही गुंतवणूक करता येणार नाही.

हे ही वाचा - पीएमसी बँकेवर 'आरबीआय'कडून निर्बंध, मुंबईत बँक शाखेबाहेर लोकांची गर्दी

हे निर्बंध ६ महिने असले तरी ६ महिन्यानंतर बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन लादलेल्या निर्बंधांबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.

Intro:पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर लादण्यात आलेल्या निर्वाणानंतर आता पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यातून केवळ एक हजार रुपये काढता येणार आहेत . आरबीआयकडून 35 अ अनुसार लादण्यात आलेल्या या निर्बंधानंतर पुढील सहा महिने बँक ग्राहक व छोटे गुंतवणूकदार यांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. आरबीआय कडून लादण्यात आलेल्या निर्बंधानंतर यासंदर्भात आपण अर्थ मंत्रालय व आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून लवकरात लवकर बँक ग्राहकांना या समस्येतून बाहेर कस काढता येईल याबद्दल चर्चा करत असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलेले आहे. Body:पीएमसी बँकेवर लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे सध्याची परिस्थिती-

सी बँक खातेदारांवर आरबीआय कडून लादण्यात आलेल्या निर्बंधानंतर एका खातेधारकाला एका खात्यात कितीही रक्कम असली तरी केवळ 1 हजार रुपयेच काढता येतील. एखाद्या ग्राहकणे पीएमसी बँकेकडून एफडी च्या आधारावर कर्ज घेतले असेल तरी कर्ज फेडण्यासाठी त्याच्या ठेवीचा वापर बँक ग्राहक करू शकतो.

पीएमसी बँकेवर आरबीआय ने बँकिंग कलाम 35 अ नुसार निर्बंध लादल्यानंतर पीएमसी बँकेवर मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करताना आरबीआय ची परवानगी घेणे आता बंधनकारक झाले आहे. या पुढे निदान सहा महिने तरी आरबीआय च्या परवानगीशिवाय बँकेला कुठलेही नवीन कर्ज वाटप करता येणार नाही. जुन्या कर्जाच्या नुतानीकरनावर आरबीआय ने तात्पुरती बंदी आणली असून , पुढील सहा महिने बँक पीएमसी बँक प्रशासणाला कुठलीही गुंतवणूक करता येणार नाही. हे निर्बंध सहा महिने जरी असले तरी सहा महिन्यानंतर बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन लादलेल्या निर्बंधांबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.

Conclusion:
Last Updated : Sep 24, 2019, 9:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.