मुंबई - दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होताना दिसत आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकार आणि प्रशासन मेहनत घेताना दिसत आहे. अशा स्थितीत वेगवेळ्या सामाजिक संस्था, ट्रस्ट यांच्याकडून मदतीचे हात पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर रयत शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक,कर्मचारी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी देणार आहेत. ही रक्कम 2 कोटी रुपये असणार असल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
-
या परिस्थितीत सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून रयत शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या एक दिवसाच्या वेतना इतकी सुमारे दोन कोटी रुपये रक्कम धनादेशाद्वारे 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-१९' मध्ये जमा करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">या परिस्थितीत सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून रयत शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या एक दिवसाच्या वेतना इतकी सुमारे दोन कोटी रुपये रक्कम धनादेशाद्वारे 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-१९' मध्ये जमा करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 30, 2020या परिस्थितीत सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून रयत शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या एक दिवसाच्या वेतना इतकी सुमारे दोन कोटी रुपये रक्कम धनादेशाद्वारे 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-१९' मध्ये जमा करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 30, 2020
कोरोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकार मोठ्या धैर्याने काम करत आहे. मात्र, संपूर्ण देशभर संचारबंदी लागू असल्याने नवे आर्थिक संकट उभे राहिल्याचे शरद पवार म्हणाले. कोणत्याही अडचणीच्या काळात ज्ञानदानाचे काम करणाऱ्या संस्था मदतीसाठी पुढे आल्याचे पवार म्हणाले.