ETV Bharat / state

Ravindra Dhangekar PC : ललित पाटील प्रकरणात डॉ. संजीव ठाकूर यांना सहआरोपी करावं - आमदार रवींद्र धंगेकर - आमदार रवींद्र धंगेकर

Ravindra Dhangekar PC : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात (Lalit Patil Drug Case) ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर (Dr Sanjeev Thakur) यांना सहआरोपी करावं, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. ठाकूर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे. आज मुंबई येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. (Ravindra Dhangekar on Lalit Patil Case)

Ravindra Dhangekar PC
आमदार रवींद्र धंगेकर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 4:01 PM IST

डॉ. संजीव ठाकूर बद्दल आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी

मुंबई Ravindra Dhangekar PC : कुख्यात ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात चर्चेत आलेले ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची ससून रुग्णालयातील डीन पदावरील नेमणूक रद्द करण्यात आली आहे. मॅटने तत्कालीन डीन डॉ. विनायक काळे प्रकरणात ठाकूर यांची डीन पदावरील नेमणूक रद्द करण्यात आली आहे. ललित पाटील प्रकरणात कोणतीही कारवाई त्यांच्यावर करण्यात आलेली नाही. यावर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी डॉ. संजीव यांना ललित पाटील प्रकरणात सह आरोपी करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. (Lalit Patil Case Update)

दीड महिन्यात कुठलाही तपास नाही : ड्रग्ज माफिया ललित पाटील विषयावर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. मॅटने काल ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्या विरोधात निकाल लागल्यावर ललित पाटील प्रकरणात जी समिती नेमण्यात आली होती, त्याचा अहवाल सादर केला. त्यात अस्थिव्यंग उपचार पथक प्रमुख डॉ. प्रवीण देवकाते यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. शासनाकडून ही नौटंकी करण्यात येत आहे. दीड महिना झाला तरी अजूनही कोणताही तपास करण्यात आलेला नाही. याचा तपास जलद गतीनं करावा आणि यात जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसंच डॉ. संजीव ठाकूर यांना सहआरोपी करण्यात यावं अशी मागणी यावेळी आमदार धंगेकर यांनी केली आहे.

ललितला पुन्हा पोटदुखीचा त्रास : सध्या ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात असून पुणे पोलीस तपास करत आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना ललित पाटील याला आता पुन्हा एकदा हर्नीया आणि पोटदुखीचा त्रास सुरू झालाय. याआधी देखील या आजाराच्या नावाखाली ललित पाटील हा ससून रुग्णालयात 9 महिने तळ ठोकून होता आणि ससून मधूनच तो ड्रग्जचा व्यवहार करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ससूनमध्ये उपचार सुरू असतानाच ललित पाटीलने पलायान केलं होतंं. यानंतर त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. आता पुणे पोलिसांच्या तो ताब्यात असून त्याचा तपास पुणे पोलीस करत आहे.

हेही वाचा:

  1. Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे मुंब्र्यात येण्यापूर्वीच 'पेटलं रान' ; अज्ञात कार्यकर्त्यांनी फाडले स्वागताचे बॅनर
  2. Sanjay Raut On CM : मुंब्र्यात विरोधकांच्या छातीवर पाय देऊन समाचार घेणार; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
  3. ANC Seized Drugs : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पाच कोटींचं ड्रग्ज जप्त; अँटी नार्कोटिक्स सेलनं नायजेरियन तस्कराला केलं अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.