ETV Bharat / state

जातीपातीच्या पलीकडे युवक-युवतींचा अनोखा मेळावा

author img

By

Published : Jan 4, 2020, 7:46 PM IST

साहित्यिक डॉक्टर गणेश देवी यांनी काही दिवसांपूर्वी धर्माचा विचार न करता लग्न करण्याचे आवाहन युवक-युवतींना केले होते. त्याला राज्यभरातील सुमारे पाच हजार युवक-युवतींनी प्रतिसाद दिला. मुंबईतील अशा युवक-युवतींचा संवाद मेळावा आज दादरच्या राजा शिवाजी विद्यालय येथील बी. एन. वैद्य सभागृहात पार पडला.

marriage
जातीपातीच्या पलीकडे युवक-युवतींचा अनोखा मेळावा

मुंबई - एका विशिष्ट जातीचे किंवा धर्माचे युवक-युवती मेळावे अनेक वेळा पहायला मिळतात. मात्र, समाजातील जातीव्यवस्था नष्ट करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून आज (4 जानेवारी)लग्नासाठी जाती-धर्माचा विचार न करणाऱ्या युवक-युवतींचा मेळावा पार पडला. राष्ट्र सेवा दल आणि छात्रभारती तर्फे दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात या अनोख्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

जातीपातीच्या पलीकडे युवक-युवतींचा अनोखा मेळावा

साहित्यिक डॉक्टर गणेश देवी यांनी काही दिवसांपूर्वी धर्माचा विचार न करता लग्न करण्याचे आवाहन युवक-युवतींना केले होते. त्याला राज्यभरातील सुमारे पाच हजार युवक-युवतींनी प्रतिसाद दिला. मुंबईतील अशा युवक-युवतींचा संवाद मेळावा आज दादरच्या राजा शिवाजी विद्यालय येथील बी. एन. वैद्य सभागृहात पार पडला. या मेळाव्यात लग्न करताना जाती-धर्माची विचारणा न करणाऱ्याचा निर्धार केलेल्या युवक-युवतींनी उपस्थित दर्शवली होती.

हेही वाचा - 'सैराट'ची पुनरावृत्ती; आंतरजातीय प्रेमसंबंधाला विरोध करत बापानेच केले मुलीच्या शरीराचे तुकडे

आज छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे 37वे राज्य अधिवेशन होते. याला जोडूनच राष्ट्रसेवा दल आणि छात्रभरती यांनी एकत्र येत या मेळाव्याचे आयोजन केले होते. "जातीव्यवस्था नष्ट करायची असेल तर, जास्तीत जास्त तरूणांनी आंतरजातीय विवाह करावा", असे मत डॉ. गणेश देवी यांनी यावेळी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले आहे. या मेळाव्याला अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, आमदार कपिल पाटील तसेच इतर मान्यवरांनी तरुणांशी अनौपचारिक गप्पा मारल्या.

Intro:जातीच्या पलीकडे युवक-युवतींचा अनोखा मेळावा....

जातीय लग्न मेळावा अनेक ठिकाणी अनेकांनी पाहिला आहे मात्र या जातीय लग्नसोहळ्यातील लग्न हे मनाविरुद्ध लग्न असतात आणि त्यामुळे विपरीत घटना घडल्याचे आपण ऐकले आहे पाहिले आहे. मात्र या जातीय युवक-युवती लग्न मेळावा डावलून समाजातून जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी लग्न करताना जाती-धर्माचा विचार न करणाऱ्या युवक-युवतींचा आज राष्ट्र सेवा दल आणि छात्रभारती तर्फे जातीच्या पलीकडे युवक-युवती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

Body:लग्न करताना जाती-धर्माचा विचार करणार नाही असा संकल्प या मेळाव्यात युवक व युवतिने केला आहे. डॉक्टर गणेश देवी यांच्या कडून काही दिवसापूर्वी धर्माचा विचार न करता लग्न करणारा असा आव्हान युवक-युवतींना करण्यात आल होत .त्या आव्हानाला राज्यभरातून सुमारे पाच हजार युवक-युवतींनी प्रतिसाद दिला .त्यानुसार निर्णय घेतलेल्या मुंबईतील युवक-युवतींचा आज संवाद मेळावा राष्ट्र सेवा दल आणि छत्रभरती विद्यार्थी संघटनेतर्फे दादरच्या राजा शिवाजी विद्यालय येथील बी एन वैद्य सभागृहात आयोजित केला होता .या मेळाव्यात लग्न करताना जाती-धर्माचा विचारणा करणाऱ्या युवक-युवती उपस्थित राहिले होते.

छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या 37 व्या राज्य अधिवेशन आज होते. याला जोडूनच राष्ट्रसेवा दल आणि छत्रभरती यांनी एकत्र येत जातीच्या पलीकडे युवक-युवती मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ,आमदार कपिल पाटील तसेच इतर मान्यवर यांनी तरुणांशी व तरुणींची अनौपचारिक गप्पा मारल्या.

Conclusion:युवक-युवतींनी यांनी जातीच्या पलीकडे जाऊन देशातून जातीव्यवस्था नष्ट करायचे असेल तर आंतरजातीय विवाह करायला हवे असे बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील म्हटले आहे त्यानुसारच डॉक्टर गणेश देवी यांनी आपण जास्तीत जास्त तरुणांना व तरुणींना आव्हान करू की आंतरजातीय लग्न करा आणि जातिव्यवस्था नष्ट करा असे गणेश देवी यांनी ईटीव्ही भारतला बोलताना सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.