मुंबई Rashmi Shukla DGP : रश्मी शुक्ला यांना राजाच्या पहिल्या पोलीस महासंचालक म्हणून मान मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या पोलिस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची निवड होणार या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर 2019 मध्ये फोन टॅपिंगचे आरोप करण्यात आले होते. मुंबई आणि पुण्यात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोन्ही एफआयआर केले रद्द : महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही कारवाई करण्यात आली होती. राज्यात सरकार बदलताच पोलिसांनी गुन्ह्याप्रकरणी सी समरी अहवाल कोर्टात सादर केला. त्यामुळं प्रकरणात त्यांच्यावर खटला चालवण्यास सरकारनं नकार दिला. त्यामुळं मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्धचे दोन्ही एफआयआर रद्द केले आहेत.
राज्यात महिला सुरक्षेबाबत चांगले काम सुरु करणार : रश्मी शुक्ला यांनी सांगितलं की, मी नव्याने सुरुवात करत आहे. महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेसाठी आमचं प्राधान्य असेल, मात्र राज्यात महिला सुरक्षेबाबत चांगले काम सुरु आहे. सायबर क्राईमप्रकरणी जागरूकता आणि सतर्क राहण्यासाठी प्रयत्न केले जातील. हायवेवरील होणारे अपघात याकडं देखील आमचं लक्ष असेल आणि ते अपघात कमी करण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्र सर्वात सुरक्षित ठेवला जाईल.
महाविकास आघाडी काळात फोन टॅप प्रकरण : तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, गृह खात्यानं आता रश्मी शुक्ला यांची नियुक्ती आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्याला पोलीस प्रशासनाचा उपयोग करण्याच्या हेतूनंच केली आहे, असा गंभीर आरोपही शरद पवार गटाच्या प्रवक्ता विद्या चव्हाण यांनी केली होता.
हेही वाचा -