मुंबई - बलात्कार पीडितेसोबत ( Mumbai Rape Victim ) 60 दिवसात लग्न करण्याच्या अटीवर मुंबईतील अभिनेत्याला न्यायालयाने जामीन ( Mumbai High Court Grant Bail To Actor ) दिला होता. मात्र या पीडित महिलेचे यापूर्वी दोन लग्न झाले असल्याची माहिती बलात्काराचा आरोप ( Rape Accused Actor In Mumbai ) असलेल्या अभिनेत्याला मिळाली. त्यामुळे आरोपी अभिनेत्याने महिलेविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) धाव घेतली आहे.
अभिनेत्यावर बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप व्यवसायाने अभिनेता असलेल्या आरोपीवर एका महिलेने बलात्कार ( Woman Rape Allegation Against Actor ) आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. यामध्ये काही महिन्यांपूर्वी त्याला अटकही झाली होती. जामीन मंजूर करताना त्याला उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) संबंधित महिलेशी 60 दिवसात लग्न करण्याची अट घातली होती. ही अट आरोपीने मान्य केली आहे. मात्र आता त्याने मुंबई पोलिस आयुक्तांना ( Mumbai Police Commissioner ) आणि अन्य पोलिसांना पत्र लिहिले असून महिलेची तक्रार केली आहे. तसेच उच्च न्यायालयात देखील याचिका केली आहे.
महिलेच्या मुंबईसह दिल्लीत बलात्कार आणि फसवणुकीच्या सहा तक्रारी विवाह करण्याआधी तिची चौकशी करावी, या हेतूने त्याने तिची माहिती काढली. संबंधित महिलेकडून मुंबईसह दिल्लीत बलात्कार ( Woman Rape Allegation Against Actor ) आणि फसवणुकीच्या सहा तक्रारी दाखल आहेत. मुंबईमध्ये तीन तर दिल्लीत सहा जणांना तिने फसवल्याच्या घटना घडल्या आहेत. ती सराईतपणे फसवणूक करते आणि बलात्काराचे आरोप करते. त्यानंतर आर्थिक तडजोड करते, असा आरोप याचिकेत अभिनेत्याने केला आहे.